वॉशिंग्टन : एल्ले फॅशन मॅगझिनच्या प्रसिद्ध लेखिका ई जेन कॅरोल यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नव्वदच्या दशकात न्यूयॉर्कच्या एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ट्रम्पनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला आहे. यामुळे ट्रम्प पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित असल्यापासून वादात सापडले आहेत. त्यांच्यावर योग प्रशिक्षक महिलेपासून अगदी हाऊसकिपींग करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. आता त्यामध्ये लेखिकेची भर पडलेली आहे.
कॅरोल यांनी सांगितले की, माझ्यावर ट्रम्प यांनी बलात्कार केला. ही घटना 1995-96 च्या काळात घडली होती. जेव्हा आम्ही दोघे मॅनहटनच्या एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खरेदी करत होतो, तेव्हा ही घटना घडली. ट्रम्प तेव्हा प्रसिद्ध रिअल इस्टेट विकासक होते. मी तेव्हा एक टीव्ही शो करत होते.
स्टोअरमध्ये ट्रम्प यांनी आपल्याशी चांगले वर्तन करत एका महिलेसाठी अंतवस्त्र खरेदी करण्याच्या बहाण्याने विचारले. जेव्हा ड्रेसिंग रुमचा दरवाजा बंद होता तेव्हा त्यांनी भिंतीच्या बाजुला ढकलले. यावेळी माझ्या डोक्याला मार लागाला आणि त्यानंतर त्यांनी किस करत काढता पाय घेतला. तेव्हा मी पोलिसांकडे गेली नाही, कारण घाबरली होती. कोणीतरी मला ठार मारेल अशी भीती वाटत होती, असे कॅरोल यांनी सांगितले. या पूर्ण घटनेचा खुलासा कॅरोल यांच्या पुस्तकात केला आहे. न्यूयॉर्क मैगजीनने या बाबत शुक्रवारी लेख लिहिला आहे. यामध्ये कॅरोल या 16 व्या महिला आहेत, ज्यांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.