शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातवीत शिकणारी ही चिमुकली गाते ८० भाषेत गाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 17:47 IST

भारतीय वंशाची ही मुलगी मुळची केरळची असून ती आता दुबईत शिक्षण घेते आहे.

ठळक मुद्देया मुलीला याच वयात ८० भाषेत गाणी येतात. ती फक्त इयत्ता सातवीत आहे.आणखी पाच भाषेत गाणी गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवायचा तिचा मानस आहे.

दुबई - आपले बोबडे उच्चार स्पष्ट करण्याच्या वयात एका मुलीने तब्बल 80 भाषेत गाणी गाण्याचा विक्रम केलाय. सुचेता सतीश असं या चिमुकलीचं नाव असून ती दुबईमधील इंडियन हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकते आहे. सुचेता आता आणखी एक नवा विक्रम करणार आहे. 29 डिसेंबर रोजी तब्बल 85 भाषेतील गाणं गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणार आहे. त्यामुळे आणखी 5 भाषा तिला अवगत करायच्या असून अगदी कमी वेळात या 5 भाषांचा ती अभ्यास करणार आहे. 

आता तुम्हाला वाटेल की सुचेता अगदी लहानपणापासून गाण्याचा रियाझ करत असेल, पण तसंही अजिबात नाहीए. गेल्या वर्षाभरापासूनच तिने गाणं शिकायला सुरुवात केलीय. वर्षभरात गाणं शिकून एवढ्या भाषा आत्मसात करणं फार आव्हानात्मक असल्याने तिच्या या कलेविषयी सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुचेता ही मुळची केरळची असून तिला भारतीय भाषाही येतात. हिंदी, मल्याळम आणि तामिळ या तीन भारतीय भाषांचा त्यात समावेश आहे. तर, जपानी आणि इंग्रजी या दोन जागतिक भाषाही तिला येतात. सुचिताच्या वडिलांचे जपानी मित्र एकदा घरी आले असता तिने त्यांच्याकडून जपानी भाषा शिकून घेतली होती. 

भाषेचे उच्चार सोपे असतील तर गाणं शिकायला फक्त 2 तास लागतात, पण उच्चार कठीण असतील तर थोडा वेळ लागतो. मात्र काही उच्चार फार सोपे असतात, त्यामुळे तासाभरात त्या भाषेतील गाणं शिकता येतं, असं सुचेता सांगते. जास्त भाषेत गाणं सादर करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याआधीही एका गायकाची नोंद झाली आहे. केसिराजू श्रीनिवास असं त्या गायकाचं नाव असून त्याने 76 भाषेत गाणं गाऊन आपलं नाव गिनीज बुकमध्ये कोरलं होतं. आता सुचेता या पुरस्कारासाठी तयारी करत असून तिने 85 भाषांचं लक्ष ठेवलं आहे. त्यातील 80 भाषा तिला येत असून 5 भाषांचा अभ्यास सुरू असल्याचं ती सांगते. 

सौजन्य - www.gdnonline.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयkeralकेरळIndiaभारतKeralaकेरळ