पृथ्वीसारखे सात ग्रह सापडले, पाणी असण्याचीही शक्यता
By Admin | Updated: February 23, 2017 05:09 IST2017-02-22T23:57:32+5:302017-02-23T05:09:13+5:30
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाला सौरमंडळाच्या बाहेर पृथ्वीसारखे 7 ग्रह सापडले

पृथ्वीसारखे सात ग्रह सापडले, पाणी असण्याचीही शक्यता
ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 22 - न्यू यॉर्क : पृथ्वीसारखी कोणताचा ग्रह नसल्याचा आपला भ्रम आता दूर झाला आहे. पृथ्वीसारखेच सात ग्रह त्यांच्या सूर्याभोवती फिरत असल्याचा शोध अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने लावला आहे. विशेष म्हणजे या ग्रहांवर पाणी आहे आणि म्हणजेच, जीवसृष्टीही असण्याची दाट शक्यता आहे.
नासाने अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी १ वाजता न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या ग्रहांवर पोहोचण्यासाठी ४० प्रकाशवर्ष लागतील, असेही नासाने म्हटले आहे.
स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे नासाने हा शोध लावला असून, सूर्यमालेबाहेर एकाच वेळी एवढ्या संख्येने ग्रह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्याला दिसणाऱ्या सूर्याएवढ्याच आकाराच्या दुसऱ्या सूर्याभोवती हे सात ग्रह फिरतात. त्यावर पाणी आहे. एवढच नाही, सातपैकी तीन ग्रहांवर पाणी असण्याची खात्री, नासाला आहे. सूर्यमालेबाहेर असल्याने या ग्रहांना एक्सोप्लॅनेट्स असे नाव म्हटले गेले आहे.