विमानतळात आढळले जळालेले सात मृतदेह

By Admin | Updated: June 11, 2014 01:20 IST2014-06-11T01:20:07+5:302014-06-11T01:20:07+5:30

पाकिस्तानी प्रशासनाला कराची विमानतळावर मंगळवारी सात कर्मचा:यांचे जळालेले मृतदेह आढळून आले.

Seven bodies burned at the airport | विमानतळात आढळले जळालेले सात मृतदेह

विमानतळात आढळले जळालेले सात मृतदेह

>कराची : पाकिस्तानी प्रशासनाला कराची विमानतळावर मंगळवारी सात कर्मचा:यांचे जळालेले  मृतदेह आढळून आले. हे कर्मचारी तालिबानी हल्ल्यादरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या शीतगृहामध्ये अडकले     होते. 
काल रात्री पीडितांच्या नातेवाईकांनी कराचीतील मुख्य रस्त्यावर आंदोलन करून आमच्या नातेवाईकांचा शोध घ्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर ही शोधमोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे मृतदेह विमानतळावरील शीतगृहात आढळले. हल्ल्यामुळे हे शीतगृह मोठय़ा प्रमाणात जळाले होते. 
हज टर्मिनलला लागूनच शीतगृहाची सुविधा आहे. विमानतळात घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी याच मार्गाचा वापर केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Seven bodies burned at the airport