शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशाच्या संसदभवनाजवळ साखळी बॉम्बस्फोट, अवघ्या 100 मीटर अंतरावर होता भारतीय संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 17:23 IST

मिळालेल्या माहितीनुसार एक स्फोट पोलिस स्टेशन आणि दुसरा संसद भवनाच्या इमारतीजवळ झाला.

कंपाला : आफ्रिकन देश युगांडा सीरियल ब्लास्टने हादरले. युगांडाची राजधानी कंपालामध्ये संसद भवनाजवळ झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले. भारतीय पॅरा बॅडमिंटन संघ स्फोटाच्या ठिकाणापासून केवळ 100 मीटर अंतरावर होते. सुदैवाने या स्फोटात भारतीय संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही. भारतीय पॅरा बॅडमिंटन संघ काही दिवसांपूर्वीच पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल-2021 मध्ये सहभागी होण्यासाठी युगांडा येथे पोहोचला आहे. या संघात टोकियो पॅरालिम्पिक-2021 मधील पदक विजेते प्रमोद भगत, मनोज सरकार आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.

इमारतीला लक्ष्य करून स्फोट घडवला

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक स्फोट पोलिस ठाण्याजवळ झाला आणि दुसरा स्फोट संसद भवनाजवळ रस्त्याच्या कडेला झाला.संसदेजवळील स्फोट हा विमा कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीला लक्ष्य करुन करण्यात आला असावा. स्फोटामुळे तेथे उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. नॅशनल ब्रॉडकास्टर यूबीसीच्या म्हणण्यानुसार, स्फोट झाल्यानंतर काही खासदार संसद भवनाच्या संकुलातून बाहेर पडताना दिसले.

सातत्याने स्फोट होत आहेतदुसऱ्या जागेजवळ उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस स्टेशनजवळ धूर निघताना दिसत आहे. स्फोट बॉम्बमुळे झाला की अन्य कोणत्या गोष्टीमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. युगांडाचे अधिकारी यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहेत. 23 ऑक्टोबर रोजी कंपाला येथील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता आणि किमान सात जण जखमी झाले होते.

 

टॅग्स :Blastस्फोटBombsस्फोटके