सेरेना विल्यम्स होणार आई, गरोदरपणातच जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन
By Admin | Updated: April 20, 2017 11:29 IST2017-04-20T10:36:05+5:302017-04-20T11:29:41+5:30
सेरेना विल्यम्सने पिवळ्या रंगाचा वन पीसमधील फोटो स्नॅपचॅटवर शेअर करत त्याला "20 वीक्स" असं कॅप्शन दिलं आहे

सेरेना विल्यम्स होणार आई, गरोदरपणातच जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 20 - जगातील दुस-या क्रमांकाची टेनिसस्टार सेरेना विल्यम्स गरोदर आहे. सेरेना विल्यम्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. सेरेना विल्यम्सने पिवळ्या रंगाचा वन पीसमधील फोटो स्नॅपचॅटवर शेअर करत त्याला "20 वीक्स" असं कॅप्शन दिलं आहे. म्हणजे सेरेना 20 आठवड्यांची गर्भवती आहे. याचा अर्थ जानेवारी महिन्यात सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तेव्हा ती गरोदर होती. मात्र स्नॅपचॅटवरील ही पोस्ट तिने काही वेळातच डिलीट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सेरेना पुढच्या आठवड्यातही टेनिस खेळणार असल्याचं तिच्या टीमने सांगितलं आहे.
सेरेनाने स्नॅपचॅटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा स्विमसूट घातला आहे. फोटोमध्ये सेरेना आरशासमोर उभी राहून सेल्फी घेत असल्याचं दिसत आहे. सेरेना आई होणार असल्याच्या वृत्ताला तिच्या प्रवक्त्यानेही दुजोरा दिला आहे.
सेरेनाची बातमी मिळताच चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जानेवारी महिन्यात सेरेनानं बहीण व्हीनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर ती टेनिसच्या कोर्टपासून दूर राहिली आहे. सेरेनाने आतापर्यंत 23 वेळा ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावण्याचा मान मिळवला आहे. मात्र पुढील आठवड्यात पुन्हा ती खेळण्यासाठी उतरणार असल्याचं तिच्या टीमने सांगितलं आहे.