महिला नौसैनिकांच्या न्यूड फोटोंमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 15:13 IST2017-03-06T15:07:21+5:302017-03-06T15:13:04+5:30
सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे अश्लील फोटो, व्हीडिओ शेअर करणयाच्या प्रवृत्तीही बळावल्या आहेत. आता तर महिला सैनिकही या विकृतीच्या शिकार

महिला नौसैनिकांच्या न्यूड फोटोंमुळे खळबळ
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत सायबर क्राइमचे प्रमाणही झपाट्याने वाढत चालले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे अश्लील फोटो, व्हीडिओ शेअर करणयाच्या प्रवृत्तीही बळावल्या आहेत. आता तर महिला सैनिकही या विकृतीच्या शिकार झाल्या असून, अमेरिकन नौसेनेतील महिला सैनिकांचे अश्लील फोटो फेसबूक ग्रुपवर शेअर केल्या प्रकरणी शेकडो पुरुष नौसैनिकांची चौकशी सुरू आहे.
या संदर्भातील वृत्त डेली मेल या वृत्तपत्रात प्रकाशित झाले असून, या वृत्तानुसार 'सेंटर फॉर इन्वेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग ऑफ द वॉर हाऊस'च्या अहवालातून हा प्रकार उघडकीस आला आहे. मरिन्स युनायटेड नावाच्या सिक्रेट ग्रुपमध्ये अशा प्रकारची हजारो छायाचित्रे प्रसारित केली जात असून, त्यात सध्या नौदलात सेवेमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. या ग्रुपमध्ये 30 हजारहून अधिक फॉलोअर्स असून, त्यातून पीडितांवर उत्तेजक आणि अश्लील शेरेबाजी केली जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, यातील दोन डझनहून अधिक पीडित महिलांची ओळख पटली आहे. या अश्लील ग्रुपचे सदस्य असलेल्या व्यक्तीच नव्या सदस्यांना समाविष्ट करू शकतात. तसेच हा ग्रुप केवळ आजी आणि माजी सदस्यांनाच सर्च करता येतो. दरम्यान, हा ग्रुप चालवत असलेल्या व्यक्ती हा ग्रुप मुव्ह करत राहतात. त्यामुळे त्याच्या स्कोपचा शोध घेणे अवघड झाले आहे, असे अमेरिकेच्या नौदलाचे जनसंपर्क अधिकाऱी कॅप्टन रेयान एल्विस यांनी सांगितले.