निस्वार्थी लोकांना वारंवार मिळते सेक्सची संधी

By Admin | Updated: August 8, 2016 16:47 IST2016-08-08T16:47:07+5:302016-08-08T16:47:07+5:30

तुम्ही निस्वार्थी वृत्तीचे आहात का ? तुमचे उत्तर 'हो' असेल तर, तुम्हाला चांगले सेक्सचे सुख मिळेल.

Selfless people often get sex opportunities | निस्वार्थी लोकांना वारंवार मिळते सेक्सची संधी

निस्वार्थी लोकांना वारंवार मिळते सेक्सची संधी

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. ८ - तुम्ही निस्वार्थी वृत्तीचे आहात का ? तुमचे उत्तर 'हो' असेल तर, तुम्हाला चांगले सेक्सचे सुख मिळेल. आता तुम्ही म्हणाल निस्वार्थी असण्याचा आणि सेक्स सुखाचा काय संबंध ? कॅनडातील गुलेफ आणि निपीसिंग विद्यापीठाच्या संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. 
 
या विद्यापीठाच्या संशोधकांनी ८०० लोकांशी चर्चा केली. त्यांचे संबंध आणि प्रवृत्ती संदर्भात जाणून घेतले. मानसशास्त्रा संदर्भातील ब्रिटीश जर्नलमध्ये या अभ्यासाचा निष्कर्ष प्रसिद्ध झाला आहे. 
 
जे लोक निस्वार्थीवृत्तीने दुस-याच्या भल्यासाठी काम करतात त्यांना प्रेम प्रकरणात यश मिळते तसेच वारंवार सेक्सची संधी मिळते असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. स्वार्थी लोकांपेक्षा निस्वार्थी लोकांना सेक्स आणि प्रेम प्रकरणात जास्त यश मिळते असे प्राध्यापक पॅट बारक्ले यांनी सांगितले. 
 

Web Title: Selfless people often get sex opportunities