रॅटलस्नेकसह सेल्फी दीड लाख डॉलरची
By Admin | Updated: July 26, 2015 23:34 IST2015-07-26T23:34:06+5:302015-07-26T23:34:06+5:30
रॅटलस्नेक या अत्यंत विषारी सापासह सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका माणसाच्या जिवावर उठला असून, या माणसाला सापाने चावा घेतल्यामुळे

रॅटलस्नेकसह सेल्फी दीड लाख डॉलरची
लंडन : रॅटलस्नेक या अत्यंत विषारी सापासह सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका माणसाच्या जिवावर उठला असून, या माणसाला सापाने चावा घेतल्यामुळे बरे होण्यासाठी १ लाख ५० हजार डॉलरपेक्षा जास्त खर्च आला आहे. सॅन दिएगो येथील माणसाने या साहसाची किंमत मोजली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीस घडलेल्या या घटनेत फासलर नावाच्या माणसाने रॅटल स्नेक हा साप पाळला होता. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी, त्याने सापाला गवतात ठेवले व फोटोसाठी त्याला नीट करण्याचा प्रयत्न केला. सापाने फासलरला डंख मारला. सापाने चावा घेताच फासलरचे शरीर थरथरू लागले. त्याच्या हाताला सापाने चावा घेतला होता, तो भाग जांभळा झाला.