सेल्फीचा नादच खुळा! त्याने तीन मिनिटांत काढल्या 122 सेल्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 17:09 IST2016-10-28T17:09:02+5:302016-10-28T17:09:02+5:30

अमेरिकी गायक आणि अभिनेता डॉनी वॉलबर्गने तीन मिनिटात 122 जणांसोबत सेल्फी काढत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

Selfie nudacha open! He took 122 selfies in three minutes | सेल्फीचा नादच खुळा! त्याने तीन मिनिटांत काढल्या 122 सेल्फी

सेल्फीचा नादच खुळा! त्याने तीन मिनिटांत काढल्या 122 सेल्फी

>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 28 - इतरांपेक्षा जरा हटके काहीतरी करून  गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी लोक काय काय करतील याचा भरवसा नाही. अशाचा अवलियांमध्ये आता अमेरिकी गायक आणि अभिनेता डॉनी वॉलबर्गचे नावही समाविष्ट झाले आहे. वॉलबर्गने तीन मिनिटात 122 जणांसोबत सेल्फी काढत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. 
डॉनीने क्रूझवर हा विक्रम केला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे असंख्य चाहते उपस्थित होते. हा विक्रम करण्यासाठी डॉनीचे चाहते ओळीत उभे राहिले. त्यानंतर डॉनी प्रत्येकाबरोबर सेल्फी घेत गेले.दरम्यान, तीन मिनिटांच्या आत तब्बल 122 जणांसोबत वेगवेगळ्या सेल्फी घेत त्यांनी एका नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.
('गिनिज बुक'मध्ये होणार हिल मॅरेथॉनची नोंद)
यावेळी त्यांच्या विक्रमाची पाहणी करण्यासाठी गिनिज बुकची टीम उपस्थित होती. डॉनी वॉलबर्ग 90 च्या दशकातील अमेरिकेतील प्रसिद्ध कलाकार असून, त्यांनी बनवलेला बॉईज बँड खूप प्रसिद्ध झाला होता.  
 

Web Title: Selfie nudacha open! He took 122 selfies in three minutes