शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भारताची फ्रान्समधील मालमत्ता जप्त करा; ‘केर्न एनर्जी’प्रकरणी फ्रान्समधील न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 09:39 IST

फ्रान्सच्या न्यायालयाने ११ जून राेजी भारत सरकारच्या मालमत्तांच्या जप्तीचा आदेश दिला हाेता. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया बुधवारी पूर्णझाली.

नवी दिल्ली : ब्रिटनच्या केर्न एनर्जीविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात भारत सरकारला धक्का बसला आहे. भारत सरकारकडून १.७ अब्ज डॅालर्सच्या थकबाकीबाबत फ्रान्स येथील न्यायालयाने केर्न एनर्जीच्या बाजूने निकाल दिला आहे. पॅरिस येथील भारत सरकारच्या २० मालमत्ता जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे; मात्र याबाबत अद्याप काेणतीही नाेटीस, आदेश किंवा पत्रव्यवहार प्राप्त झालेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

फ्रान्सच्या न्यायालयाने ११ जून राेजी भारत सरकारच्या मालमत्तांच्या जप्तीचा आदेश दिला हाेता. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया बुधवारी पूर्णझाली. या मालमत्तांमध्ये बहुतांश सदनिका आहेत. त्यांचे मूल्य दाेन काेटींहून अधिक आहे. भारत सरकारकडून त्यांचा वापर करण्यात येताे. त्यात राहणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना बाहेर काढण्याची शक्यता कमी आहे; मात्र सरकार या मालमत्ता विकू शकत नाही. 

सरकारकडून पडताळणीअशा प्रकारचे आदेश खराेखर देण्यात आले आहेत का, याबाबत सरकारकडून पडताळणी करण्यात येत असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारला अद्याप काेणतेही आदेश किंवा पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही. केर्नप्रकरणी केंद्र सरकारने मार्चमध्येच हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला संपर्क केला असून, चर्चेद्वारे हा प्रश्न निकाली काढण्याची भूमिका आहे, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

वसुलीसाठी ७० अब्ज मूल्याच्या मालमत्तांवर नजर-     मध्यस्थता न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत सरकारने केर्न एनर्जीला १.७ अब्ज डाॅलर्सची थकबाकी व्याजासह देण्याचे आदेश दिले हाेते;  मात्र भारत सरकारने ते मान्य केले नव्हते. त्यामुळे केर्न एनर्जीने वसुलीसाठी परदेशातील अनेक न्यायालयांमध्ये अपील केले हाेते.-     वसुलीसाठी केर्न एनर्जीने तब्बल ७० अब्ज डाॅलर्स एवढे मूल्य असलेल्या भारतीय मालमत्ता ओळखून ठेवल्या आहेत. 

टॅग्स :Franceफ्रान्सIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी