समुद्रकिनारी आढळले ११७ मृत निर्वासित

By Admin | Updated: June 4, 2016 03:40 IST2016-06-04T03:40:41+5:302016-06-04T03:40:41+5:30

लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावर निर्वासितांचे शंभराहून अधिक मृतदेह आढळले आहेत. हे निर्वासित समुद्रमार्गे युरोपातील वेगवेगळ्या देशांत आश्रयाला निघाले होते.

Seismologists found 117 dead exiled | समुद्रकिनारी आढळले ११७ मृत निर्वासित

समुद्रकिनारी आढळले ११७ मृत निर्वासित

अथेन्स : लिबियाच्या समुद्रकिनाऱ्यावर निर्वासितांचे शंभराहून अधिक मृतदेह आढळले आहेत. हे निर्वासित समुद्रमार्गे युरोपातील वेगवेगळ्या देशांत आश्रयाला निघाले होते.
लिबियाच्या नौदलाच्या माहितीनुसार पश्चिम लिबियाच्या एका शहराजवळ समुद्रकिनारी ११७ निर्वासितांचे मृतदेह सापडले. ते नेमके कोणत्या देशाचे आहेत त्याबाबत माहिती मिळू शकली नाही. संयुक्त राष्ट्र शरणार्थी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून दोन लाखांहून अधिक निर्वासितांनी युरोपात प्रवेश केला आहे, तर प्रवासादरम्यान दुर्घटनेत २,५०० निर्वासितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Seismologists found 117 dead exiled