शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेची युद्धनौका पाहून संतापला चीन, सार्वभौमत्वाचा सन्मान करा, चीनचा अमेरिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 6:57 PM

दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनच्या संतापाला पारावार उरला नाहीये. अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृत्याला चीननं विरोध दर्शवला आहे.

बीजिंग -  दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनच्या संतापाला पारावार उरला नाहीये. अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृतीला चीननं विरोध दर्शवला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्र नाशक युद्धनौका चीन दावा सांगत असलेल्या द्विपाच्या जवळून गेली. या भागावरून चीनचा शेजारील देशांशी वाद सुरू आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, चीननं युद्धनौकेची ओळख पटवण्यासाठी स्वतःचं सैन्य जहाज तिथे पाठवलं आणि अमेरिकेच्या युद्धनौकेला तिथून जाण्याचा इशारा दिला. अमेरिकेच्या युद्धनौकेनं चीनचा कायदा व संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे. तसेच चीनचं सार्वभौमत्व व सुरक्षेच्या हितांचंही उल्लंघन केलं आहे. चीननं कडक शब्दात याचा निषेध नोंदवल्याचंही चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेच्या नौदलानं चौथ्यांदा केलेलं फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन(FNOP) आहे.परंतु अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून अद्यापही याबाबत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानं दिलेल्या मर्यादेतच अमेरिकेच्या युद्धनौका प्रवास करतात. आम्ही नियमित स्वरूपात FNOP करतोय, आम्ही पहिल्यापासून हे करत आलो आहोत. तसेच भविष्यातही करत राहू. अमेरिकेचं नौदल दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या दाव्याला आव्हान देण्यासाठी नियमितरीत्या असे ऑपरेशन करत असते. व्हिएतनाम, फिलिपिन्स, तायवानही या द्विपांवर दावा करतात. चीनचं सरकार स्वतःच्या सीमा व सार्वभौमत्वाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध असेल. अमेरिकेनंही आमच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. ट्रम्प हे उत्तर कोरियाशी दोन हात करण्यासाठी चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. चीन उत्तर कोरियाचा महत्त्वाचा शेजारील देश असून, सर्वात मोठा भागीदार देशही आहे.