अतिरेकी हल्ला केलात तर बघा

By Admin | Updated: January 19, 2015 11:00 IST2015-01-19T02:48:46+5:302015-01-19T11:00:56+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याआधी अमेरिकेने पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौ-यात दहशतवादी हल्ला व सीमापार घातपात होता कामा नये

See if terrorist attacks are done | अतिरेकी हल्ला केलात तर बघा

अतिरेकी हल्ला केलात तर बघा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याआधी अमेरिकेने पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौ-यात दहशतवादी हल्ला व सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही सांगण्यात आले आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिका व भारत ओबामा यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट काळजी घेत आहे, कारण या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या कालावधीत दोन तास वा त्यापेक्षा अधिक काळ खुल्या मंचावर असतील. ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या काळात पाकिस्तानने सीमापार दहशतवादाच्या कोणत्याही कारवाया करता कामा नये किंवा तसे प्रयत्न करताही कामा नयेत. पाकिस्तानने काही आगळीक केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कोणत्याही हल्ल्याचा माग काढला जाईल, असे पाकला बजावण्यात आले आहे. भारतात ज्यावेळी अमेरिकेचे महत्त्वाचे पाहुणे असतात, तेव्हा दहशतवादी हल्ले करणे हा पाकचा नेहमीचा कार्यक्रम आहे.
 

Web Title: See if terrorist attacks are done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.