सिक्रेट सर्व्हिसचे काम विश्वसनीय- ओबामा
By Admin | Updated: September 24, 2014 03:46 IST2014-09-24T03:46:29+5:302014-09-24T03:46:29+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता ही सिक्रेट सर्व्हिस समर्थपणे पार पाडत असल्याचे म्हटले आहे

सिक्रेट सर्व्हिसचे काम विश्वसनीय- ओबामा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता ही सिक्रेट सर्व्हिस समर्थपणे पार पाडत असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत व्हाईट हाऊसमध्ये दोन व्यक्तींनी घुसखोरी केली होती. त्यामुळे तेथील सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेस आला आहे. ओबामा कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे काम सिक्रेट सर्व्हिस नीट करील, असे तुम्हाला अजूनही वाटते का असा प्रश्न त्यांना व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात विचारण्यात आला असता ओबामा म्हणाले सिक्रेट सर्व्हिसने व्यवस्थित काम केले असून मी व माझे कुटुंबीय त्यांचा आभारी आहे. व्हाईट हाऊसमध्ये शुक्रवारी एक व्यक्ती घुसला होता. त्याच्या कारमधून ८०० फैरी झाडल्या जाऊ शकतील एवढ्या गोळ््या सापडल्या होत्या. त्याआधी आणखी एकजण तेथे घुसला होता.