दुस-या महिलेचा फोटो फेसुबकवर टाकला म्हणून गरोदर पत्नीने केली पतीची हत्या

By Admin | Updated: March 24, 2016 12:19 IST2016-03-24T12:16:53+5:302016-03-24T12:19:18+5:30

फेसबुकवर फोटो टाकण्यावरुन झालेल्या वादात 19 वर्षीय गरोदर पत्नीने चाकूने वार करुन आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना केनियामध्ये घडली आहे

The second woman's photo was paused on the Facebook page by the pregnant wife | दुस-या महिलेचा फोटो फेसुबकवर टाकला म्हणून गरोदर पत्नीने केली पतीची हत्या

दुस-या महिलेचा फोटो फेसुबकवर टाकला म्हणून गरोदर पत्नीने केली पतीची हत्या

>ऑनलाइन लोकमत - 
नैरोबी (केनिया), दि. २४ - फेसबुकवर फोटो टाकण्यावरुन झालेल्या वादात 19 वर्षीय गरोदर तरुणीने चाकूने वार करुन आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना केनियामध्ये घडली आहे. केल्विन असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. केल्विन विद्यार्थी तसंच उद्योन्मुख फुटबॉलपटू होता. केल्विनने आपल्या फेसबुक अकाऊंटच्या वॉलवर दुस-या महिलेचा फोटो टाकला होता. यावरुन केल्विन आणि त्याची पत्नी शेईला यांच्यात वाद झाला. आणि या वादातूनच शेईलाने चाकूने वार करुन केल्विनची हत्या केली. 
 
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पोहोचले तेव्हा केल्विनचा मृत्यू झाला होता. शेईला मृतदेहाच्या बाजूलाच बसलेली होती. केल्विनच्या गळ्यावर वार करण्यात आले आहेत. तसंच घटनास्थळावरुन चाकू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 
पोलिसांनी आरोपी पत्नीला न्यायालायात हजर केले असून तपासासाठी न्यायालयाकडे अजून वेळ मागितला आहे. पोलिसांनी शेईलाची मानसिक तपासणीदेखील करणार असल्याचं सांगितलं आहे. 
 

Web Title: The second woman's photo was paused on the Facebook page by the pregnant wife