विश्वाला प्रथम प्रकाश देणाऱ्या ताऱ्यांचा शोध
By Admin | Updated: June 19, 2015 03:23 IST2015-06-19T03:23:21+5:302015-06-19T03:23:21+5:30
बिग बँग अर्थात विश्वाच्या जन्मानंतरच्या काळात प्रकाश देणारे तारे अंतराळवीरांनी शोधले आहेत. हे तारे राक्षसी आकाराचे आहेत; पण त्यांनी विविध

विश्वाला प्रथम प्रकाश देणाऱ्या ताऱ्यांचा शोध
वॉशिंग्टन : बिग बँग अर्थात विश्वाच्या जन्मानंतरच्या काळात प्रकाश देणारे तारे अंतराळवीरांनी शोधले आहेत. हे तारे राक्षसी आकाराचे आहेत; पण त्यांनी विविध ग्रह तयार होण्याच्या काळात तसेच जीवन अस्तित्वात येताना विश्व प्रकाशमय ठेवून मोठीच कामगिरी बजावली आहे.
सध्या पृथ्वीला प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात अनेक घटकांचे मिश्रण आहे; पण बिग बँगनंतर लगेचच प्रकाशमान होणाऱ्या या ताऱ्यात फक्त हैड्रोजन, हेलियम व थोडाफार लिथियम होता.
हे तारे सूर्याच्या शेकडो वा हजारो पटीने मोठे होते. त्यांचे जळणे जलदगतीने होते आणि ते अधिक तेजस्वीही होते.
या ताऱ्यावरील स्फोटातून जे घटक तयार झाले ते अवकाशात पोहोचले व त्यातून थर्मोन्यूक्लिअर प्रतिक्रिया झाल्या. त्यातून आजचे तारे जन्माला आले व आॅक्सिजन (प्राणवायू), कार्बन आणि लोह यासारखे जीवनाला आवश्यक असणारे मूलभूत घटक तयार झाले. (वृत्तसंस्था)