अण्वस्त्रधारी पाकला स्वतःचे रक्षण करता येते - सरताज अझीझ

By Admin | Updated: August 24, 2015 19:55 IST2015-08-24T19:55:31+5:302015-08-24T19:55:44+5:30

भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान सरताज अझीझ यांनी केले आहे.

Searaj Aziz can protect himself from nuclear weapons | अण्वस्त्रधारी पाकला स्वतःचे रक्षण करता येते - सरताज अझीझ

अण्वस्त्रधारी पाकला स्वतःचे रक्षण करता येते - सरताज अझीझ

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. २४ - भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी केले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत असा कांगावाही त्यांनी केला आहे. 
भारत - पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरताज अझीझ यांनी पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी चर्चा रद्द होण्यास पाकिस्तान जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या वर्षी सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदी भारताला उपखंडातील महासत्ता समजत असून पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे हे त्यांनी विसरु नये असे सूचक विधान करत त्यांनी भारताला इशाराच दिला आहे. भारतासाठी जम्मू काश्मीर हा मुद्दा नसेल तर त्यांनी सात लाख जवानांना जम्मू काश्मीरमध्ये तैनात का केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जम्मू काश्मीर हा दोन देशांमधील प्रश्न असून यावर तोडगा निघावा असे आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाटते असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Searaj Aziz can protect himself from nuclear weapons