शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

युरोपवर पुन्हा सायबर हल्ला, बँक व कंपन्यांसह सरकारी कार्यालयांना फटका

By admin | Updated: June 27, 2017 22:10 IST

युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला करण्यात आला आहे. या

ऑनलाइन लोकमत लंडन, दि. 27 - युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यामुळे युरोपमधल्या बँक आणि कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही ठप्प झालं आहे. हा व्हायरस रॅन्समवेअरचाच एक भाग असून, पेट्या असे त्याचे नाव आहे. सायबर हल्ल्यामुळे ब्रिटिश बहुराष्ट्रीय जाहिरात आणि जनसंपर्क कंपनी WPPसह अनेक कंपन्या प्रभावित झाल्या आहेत. विशेष म्हणजे युक्रेनला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. युक्रेनमधील वीज कंपन्या, सरकारी कार्यालयांतील संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या वन्नाक्राय रॅन्समवेअर सारखाच हा हल्ला आहे. युक्रेनची सेंट्रल बँक, सरकारी वीज वितरक कंपनी युक्रेनेर्गो, विमान निर्माती कंपनी एंतोनोव आणि दोन पोस्ट ऑफिस वाईट पद्धतीनं या व्हायरसमुळे प्रभावित झाले आहेत. युक्रेनची राजधानी किव्हमधल्या मेट्रोमध्ये पेमेंट कार्डलाही याचा फटका बसला आहे. तर पेट्रोल पंपांवरही कामकाज थांबवण्यात आलं आहे. युक्रेनच्या पंतप्रधानांनी या हल्ल्याला अनपेक्षित हल्ला असं म्हटलं आहे. युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी ट्विटर अकाऊंटवर एक फोटो टाकला आहे. त्या फोटोमध्ये यंत्रणा वाईट पद्धतीनं कोलमडल्याचं दिसते आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, संगणकतज्ज्ञ एलन वुडवर्ड यांनी हा हल्ला म्हणजे रॅन्समवेअरचाच एक भाग असल्याचं सांगितलं आहे. ज्या वेळी या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात आलं तेव्हा गुन्हेगारांनी व्हायरसला अपडेट केलं. आता रॅन्समवेअरचाच एक भाग असलेल्या या पेट्या नावाच्या व्हायरसनं धुडगूस घातला आहे. गेल्या महिन्यात रॅन्समवेअर व्हायरसने 100 पेक्षा जास्त देशांत धुमाकूळ घातला होता. रशिया आणि ब्रिटन या देशांना सर्वाधिक फटका बसल्याचे सांगण्यात येत होते. एक्सपीसारख्या जुन्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या संगणकांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. व्हायरसच्या हल्ल्यानंतर संगणक लॉक होतो. तो उघडण्यासाठी व्हायरस बिटकॉनसारख्या आभासी चलनातील 300 डॉलरची खंडणी मागतो. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सुरक्षा पॅच तयार केला असून, तो तात्काळ डाऊनलोड करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या आहेत.