भंगारातील खुर्चीने बनविले मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 00:17 IST2017-02-25T00:17:09+5:302017-02-25T00:17:09+5:30

तुम्ही भंगारातून खरेदी केलेली एखादी वस्तू तुमचे भाग्य बदलेल, रात्रीतून तुम्हाला श्रीमंत बनवेल, असा कधी तुम्ही विचारही केला नसेल. तथापि, भंगारातून घेतलेल्या खुर्चीने

Scissors made from scratches | भंगारातील खुर्चीने बनविले मालामाल

भंगारातील खुर्चीने बनविले मालामाल

न्यू यॉर्क : तुम्ही भंगारातून खरेदी केलेली एखादी वस्तू तुमचे भाग्य बदलेल, रात्रीतून तुम्हाला श्रीमंत बनवेल, असा कधी तुम्ही विचारही केला नसेल. तथापि, भंगारातून घेतलेल्या खुर्चीने अमेरिकेतील दाम्पत्याला करोडपती बनविले आहे. एंगस आणि त्यांच्या पत्नीने दहा वर्षांपूर्वी भंगारातून एक खुर्ची खरेदी केली होती. ही खुर्ची आपले भाग्य बदलेल, असे त्यांना कधी वाटलेही नव्हते. खुर्चीच्या दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे सहा वर्षे ती अडगळीत पडून होती. अलीकडेच या खुर्चीवरची धूळ झटकून तिची दुरुस्ती करण्यात आली. तेव्हा या खुर्चीत हिऱ्यांचे दागिने लपवून ठेवले असल्याचे त्यांना आढळून आले. एंगस यांनी ही गोष्ट पत्नीपासून लपवून ठेवली. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला हिऱ्याची अंगठी देऊन त्यांनी तिला चकित केले.

Web Title: Scissors made from scratches