शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

प्रशांत महासागराच्या तळाशी बनतोय इटली, फ्रान्स देशांपेक्षाही मोठा कच-याचा पट्टा

By vaibhav.desai | Published: August 02, 2017 2:36 PM

प्रशांत महासागरात अमेरिकेतील टेक्सास या शहराहून मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकचा पट्टा समुद्राच्या तळाशी तयार होत असल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे

ठळक मुद्देप्रशांत महासागरात अमेरिकेतील टेक्सास या शहराहून मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकचा पट्टा समुद्राच्या तळाशी तयार होत असल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला शांत महासागरात दिवसेंदिवस प्लॅस्टिकचा कचरा वाढतोय. प्लॅस्टिकमुळे महासागरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. यार होत असलेला प्लॅस्टिकच्या कच-याचा पट्टा नष्ट करणंही शक्य नसल्याचं मूरे म्हणाले आहेत. त्या प्लॅस्टिकच्या पट्ट्याचा आकार हा इटली, फ्रान्स देशांहून मोठा असून, टेक्सास शहराच्या 1.5 पट इतका आहे.

कॅलिफोर्निया, दि. 2 - सागराच्या पोटात काय काय दडलंय, याची नेहमीच चर्चा होत असते. असं म्हणतात, सागराच्या पोटात खजिना दडलाय. मात्र अमेरिकेचे संशोधक चार्ल्स मूरे यांनी नवा शोध लावला आहे. प्रशांत महासागरात अमेरिकेतील टेक्सास या शहराहून मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकचा पट्टा समुद्राच्या तळाशी तयार होत असल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे. प्रशांत महासागरात दिवसेंदिवस प्लॅस्टिकचा कचरा वाढतोय. प्लॅस्टिकमुळे महासागरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. तसेच तयार होत असलेला प्लॅस्टिकच्या कच-याचा पट्टा नष्ट करणंही शक्य नसल्याचं मूरे म्हणाले आहेत.अमेरिकेचे संशोधक मूरे आणि त्यांच्या टीमनं 6 महिने समुद्रात प्रवास करून याची माहिती मिळवली आहे. या समुद्र प्रवासादरम्यान समुद्राच्या तळाशी त्यांना प्लॅस्टिकचे तुकडे आढळले, त्या तुकड्यांची विल्हेवाट लावणंही शक्य नसल्याचंही मूरे यांनी सांगितले आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 रोजी सापडलेले प्लॅस्टिकच्या तुकडे आणि आताचे तुकडे यात साम्य आहे का, याचीही तपासणी सुरू असल्याची माहिती मुरे यांनी दिलीय. 1990पासून मूरे हे समुद्रातील प्लॅस्टिकच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करतायत. आताच केलेल्या संशोधनानुसार प्रशांत महासागरात मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकच्या कच-याचा पट्टा तयार होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. त्या प्लॅस्टिकच्या पट्ट्याचा आकार हा इटली, फ्रान्स देशांहून मोठा असून, टेक्सास शहराच्या 1.5 पट इतका आहे. समुद्राच्या तळाशी चक्रगतीनं हा प्लॅस्टिकच्या कचरा गोळा होत असून, त्याचा पट्टा हळूहळू तयार होत आहे. सर्वात आधी डॉ. मार्कस एरिक्सन यांच्या टीमनं याचा शोध घेतला होता. 2011मध्येही थोडा कच-याचा पट्टा तयार होत असल्याचं त्यांना दिसलं होतं, अशी माहिती डॉ. मार्कस यांनी इतर संशोधकांना दिली होती. याचाही खुलासा अमेरिकेचे संशोधक चार्ल्स मूरे यांनी केला आहे. पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. जेवढे जीव-जंतू जमिनीवर आहेत, त्याहीपेक्षा जास्त पाण्यात आहेत. जितके सौंदर्य जमिनीवर आहे, त्याच्या कैकपटीने ते पाण्यात आहे. त्यामुळे ते जपणं काळाची गरज आहे. समुद्रात मासेमारी करताना अनेकदा मच्छीमारांची जाळी खडकाला अडकून तुटतात. त्यातील काही भाग त्या खडकात तसाच राहतो. त्याप्रमाणेच समुद्रकिनारी आलेले पर्यटक प्लॅस्टिकच्या पिशव्या समुद्राच्या पाण्यात सोडतात. ते प्लॅस्टिक मासे खाऊन मृत पावतात आणि जैवविविधतेचे नुकसान होते. सागरी प्रवाळ (कोरल्स)समुद्रात अद्भुत रंगाच्या प्रवाळांची विलक्षण दुनिया आहे. प्रवाळ म्हणजे सागरी जिवांची वसाहत. हे जीव वाढत असताना, त्यांची पैदास होताना कॅल्शिअम कार्बोनेटची निर्मिती होते. यामुळेच प्रवाळांना नानाविध आकार निर्माण होतात. यांच्या सान्निध्यात किंवा वसाहतीत इतर अनेक जलचर आश्रय घेतात. उष्ण कटिबंधातील भागात भरपूर सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी प्रवाळांची उत्तम पैदास होते. ऑस्ट्रेलियात मैलोन्मैल लांबीचे प्रवाळांचे पट्टे आहेत. असे पट्टे तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. हे कोरल्स अत्यंत संवेदनशील असतात. बदलत्या वातावरणाचा किंवा पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर चटकन परिणाम होतो. समुद्रामध्ये सूर्याची किरणे ज्या भागापर्यंत थेट पोहोचतात आणि जेथील पाणी जास्त उथळ नसते, त्याठिकाणी सागरी प्रवाळाची निर्मिती होते. सागरी प्रवाळांमध्ये दरवर्षी एक सेंटिमीटरने वाढ होते.