सीरियातील शाळेवर हवाईहल्ला, 26 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: October 27, 2016 08:40 IST2016-10-27T08:40:19+5:302016-10-27T08:40:19+5:30
सीरियातील इदलिब प्रातांत झालेल्या हवाई हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. शाळेच्या परिसरात हा हल्ला झाल्याने मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे.

सीरियातील शाळेवर हवाईहल्ला, 26 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
सीरिया, दि. 27 - सीरियातील इदलिब प्रातांत झालेल्या हवाई हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. शाळेच्या परिसरात हा हल्ला झाल्याने मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा हल्ला कोणाकडून करण्यात आला आहे, ही माहिती अजूनही अस्पष्ट आहे. मात्र, या हल्ल्यामागे रशिया असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी हास गावातील निवासी ठिकाणे आणि शाळांना निशाणा बनवून हा हवाईहल्ला करण्यात आला. दरम्यान, इदलिब परिसर हा कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे. याआधीही या ठिकाणावर अनेक हवाईहल्ले करण्यात आले आहेत.