शाळेला आग; अठरा मुली ठार
By Admin | Updated: May 24, 2016 00:40 IST2016-05-24T00:40:49+5:302016-05-24T00:40:49+5:30
लहान मुलांसाठी असलेल्या खासगी शाळेच्या झोपण्याच्या खोलीला आग लागून १८ अल्पवयीन मुली ठार, तर अनेक जणी जखमी झाल्या. ही दुर्घटना उत्तर थायलंडमध्ये रविवारी रात्री घडली,

शाळेला आग; अठरा मुली ठार
बँकॉक : लहान मुलांसाठी असलेल्या खासगी शाळेच्या झोपण्याच्या खोलीला आग लागून १८ अल्पवयीन मुली ठार, तर अनेक जणी जखमी झाल्या. ही दुर्घटना उत्तर थायलंडमध्ये रविवारी रात्री घडली, असे पोलिसांनी सांगितले. चियांग राय प्रांतातील पिथक्कीअर्ट विट्हय्या शाळेच्या दोन मजली इमारतीला ही आग लागली. त्यात पाच शाळकरी मुली जखमी झाल्या. मृत मुली या पाच ते बारा या वयोगटातील आहेत. ३८ मुली या शाळेत मुक्कामाला होत्या. आग लागली त्या वेळी या मुली झोपेत होत्या म्हणून त्यांना सुटका करून घेता आली नाही. डोंगरावर राहणाऱ्या आदिवासींच्या या मुली होत्या. आग लागल्याचे दिसल्यावर अधिकारी केवळ काही मुलींचीच सुटका करू शकले. इतर अडकून पडल्या.