विद्याथ्र्याचा शाळेत पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Updated: November 27, 2014 23:38 IST2014-11-27T23:38:10+5:302014-11-27T23:38:10+5:30
फरिदाबाद येथील खासगी शाळेत शिकणा:या आठवीच्या विद्याथ्र्याने शाळेच्या बाथरूममध्ये अंगावर पेट्रोल ओतून आग लावल्याची घटना बुधवारी घडली.

विद्याथ्र्याचा शाळेत पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
फरिदाबाद : फरिदाबाद येथील खासगी शाळेत शिकणा:या आठवीच्या विद्याथ्र्याने शाळेच्या बाथरूममध्ये अंगावर पेट्रोल ओतून आग लावल्याची घटना बुधवारी घडली. आत्महत्येच्या प्रयत्नात हा विद्यार्थी 45 टक्के भाजला. या 13 वर्षीय विद्याथ्र्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कठीण असा गृहपाठ आणि शिक्षकांचे वारंवार रागावणो यामुळे त्रस्त होऊन आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे या विद्याथ्र्याने पोलिसांना सांगितले.
सेक्टर 29 मधील होली चाईल्ड पब्लिक स्कूलचा हा विद्यार्थी शाळेत येतानाच सोबत पेट्रोल घेऊन आला होता. त्याने सकाळच्या प्रार्थनेला हजेरी लावली व नंतर तो बाथरूममध्ये गेला. तेथे त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला आग लावली.
त्याचवेळी महिला स्वच्छता कर्मचा:याने त्याला पाहिले आणि आरडाओरड करून शिक्षकांना बोलावले. शिक्षकांनी या मुलाला लगेच रुग्णालयात नेले, अशी माहिती शाळेचे प्रिंसिपॉल दीपक रॉय यांनी दिली. (वृत्तसंस्था)
4या विद्याथ्र्याचे शिक्षक त्याला सर्वासमक्ष फटकारत असत, अशी माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. आपण पेट्रोल पंपवरून पेट्रोल विकत घेतले आणि ते बाटलीत भरून शाळेत आणले, अशी कबुली या विद्याथ्र्याने दिली.