मुंबईतल्या 13 वर्षांच्या मुलाला मिळाली परदेशात स्कॉलरशिप
By Admin | Updated: July 5, 2016 19:48 IST2016-07-05T19:48:13+5:302016-07-05T19:48:13+5:30
मुंबईतल्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलाला इंग्लंडमध्ये एटॉन कॉलेजतर्फे स्कॉलरशिप मिळाली आहे.

मुंबईतल्या 13 वर्षांच्या मुलाला मिळाली परदेशात स्कॉलरशिप
ऑनलाइन लोकमत
इंग्लंड, दि. 5- मुंबईतल्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलाला इंग्लंडमध्ये एटॉन कॉलेजतर्फे स्कॉलरशिप मिळाली आहे. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात स्कॉलरशिप मिळवून या मुलानं स्वकर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे.
13 वर्षांचा अर्जुन शाहीर हा विद्यार्थी सध्या इंग्लंडमधल्या डेडवर्थ शाळेत अभ्यासाचे धडे गिरवतो आहे. वडील अश्विन आणि आई स्वप्नल यांनी अर्जुन 5 महिन्यांचा असताना भारत देश सोडला आणि ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. पहिल्यांदा ते ऑक्सफर्डमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर ते केंब्रिज परिसरात राहायला गेले.
अर्जुनला एवढ्या लहान वयात स्कॉलरशिप मिळाल्यानं त्याच्या आईचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अर्जुन हा खूपच हुशार विद्यार्थी आहे, अशी त्याची आई म्हणाली आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वीच एटॉन कॉलेजला भेट दिली होती. अर्जुन त्यांना सोडून एटॉन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जाणार असल्यानं त्या काहीशा निराश झाल्या आहेत. मात्र अर्जुन हा नव्या कॉलेजमध्ये जाऊन नवे मित्र बनवण्यासाठी उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अर्जुन हा त्याच्या 7 वर्षांची बहीण आर्या आणि त्याचा कुत्रा स्नोवी यांची आवर्जून आठवण काढेल, असं त्याच्या आईला वाटतं.