शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाचा विजय ! भारताच्या 'या' मुलीमुळे आयर्लंडमधील गर्भपातासंबंधी कठोर कायद्यामध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 09:04 IST

आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी (26 मे) गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्याचं समर्थन केले आहे.

नवी दिल्ली - आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी (26 मे) गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्यासाठी मत नोंदवत आपले समर्थन दर्शवले आहे. या निकालामुळे एका संघर्षाचा विजय झाला आहे. बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, आयर्लंडमध्ये महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यासच गर्भपात करण्याची परवानगी दिली जाते.  मात्र बलात्कार प्रकारात गर्भपात करण्याची अनुमती येथे नाही. दरम्यान, गर्भपातासंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालामुळे भारताच्या एका मुलीच्या कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला आहे. 

काय आहे नेमका यामागील संघर्ष ?कर्नाटकमधील बेळगावातील सविता हलप्पनवारचं कुटुंबीय या जनमत चाचणीच्या निकालामुळे अत्यंत आनंदी आहेत. भारतीय डेंटिस्ट असलेल्या सविता हलप्पनवारला 2012 साली गर्भपात करण्याची परवानगी देण्यात न आल्यानं तिचा आयर्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गर्भपात करण्यासाठी वारंवार मागणी करुनदेखील तिला परवानगी देण्यात आली नाही. गर्भावस्थेत संसर्ग झाल्यानं सविताचा मृत्यू झाला होता. सविताच्या मृत्यूमुळे आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात असलेल्या कठोर कायद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता व येथून संघर्षास सुरुवात झाली. 

(नकोशींना संपविणाऱ्यांनाही हवी कठोर शिक्षा !)

66 टक्के जणांनी नोंदवलं समर्थन  येथील पंतप्रधान लिओ वरदकर यांनी शनिवारी जनमत चाचणीच्या निकालांची घोषणा केली. गर्भपातासंबंधी आलेल्या पहिल्या अधिकृत अहवालानुसार गर्भपातासंबंधी असलेले कठोर कायदे रद्द करण्यासाठी 66 जणांनी समर्थन दर्शवले आहे. वरदकर यांनी असंही सांगितले की, लोकांनी आपलं मत जाहीरपणे मांडले आहे. एका आधुनिक देशासाठी आधुनिक संविधानाची आवश्यकता आहे. 

'गर्भपातासंबंधी नवीन कायद्याचं नाव सविला लॉ असावं'दरम्यान, या निकालामुळे सविताचे कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत. सविताचे वडील म्हणाले की, ''मी या बातमीमुळे अत्यंत खूश आहे. गर्भपाताच्या नवीन कायद्याला माझ्या मुलीचं नाव द्यावे. नव्या कायद्याला 'सविता लॉ' असे नाव देण्यात यावे, अशी आमची शेवटची इच्छा आहे.  शिवाय, या चाचणीमध्ये समर्थन दर्शवणाऱ्या आयर्लंडमधील नागरिकांचे मी धन्यवाद करू इच्छितो. हा महत्त्वपूर्ण निर्णय असून कित्येक महिलांनी यासाठी संघर्ष केला आहे''.   

 

टॅग्स :Abortionगर्भपातIndiaभारत