शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लिओनार्दो दा विंचींचे चित्र खरेदी करणाऱ्या राजपूत्राचा अखेर शोध लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:27 IST

लिओनार्दोच्या ५०० वर्ष जुन्या फोटोच्या लिलावात तब्बल ३००० कोटी रुपयाची किंमत देणारा व्यक्ती इतके दिवस पडद्याआड होता.

ठळक मुद्देअबू धाबीमध्ये नुकतंच एक नवी वास्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आलं आहे.या राजपूत्राला चित्रांचा किंवा अशा दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचाही छंद नाही. एका फोनवरून त्या व्यक्तीने सगळ्यात जास्त बोली लावून लिओनार्दोचं हे चित्र विकत घेतलं होतं.

सौदी : गेल्या महिन्यात लिओनार्दो दा विंचींच्या ५०० वर्षे जुने असलेल्या चित्राविषयी चर्चा रंगली होती. ५०० वर्षे जुनं चित्र तब्बल ३ हजार कोटी रुपयांना विकलं गेल्यामुळे हे चित्र चर्चेत आलं होतं. पण हे चित्र नक्की कोणी विकत घेतलं होतं, याविषयी गुप्तता पाळण्यात आली होती. पण आता हे चित्र कोणी विकत घेतलंय याची माहिती समोर आली आहे. 

आणखी वाचा - लिओनार्दो दा विंचीच्या मोनालिसाच्या नग्न चित्राने खळबळ

लिओनार्दो दा विंचींच्या या चित्राचं नाव आहे साल्वाडोर मुंडी. ते ख्रिस्तांचं चित्र होतं. हे चित्र खरेदी करणारा माणूस हा सौदीचा एक राजपुत्र असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाईम्सने दिलं आहे. या राजपुत्राचं नाव बागेर बीन मोहम्द बीन फरहान अल सौद आहे. नोव्हेंबर महिन्यात साल्वाडोर मुंडी या चित्राचा लिलाव पार पडला. लिलावात अनेकांनी मोठ मोठ्या किंमती सांगितल्या होत्या. १९ मिनिटं चाललेल्या या लिलावात शेवटी एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने सगळ्यात जास्त बोली लावून हे चित्र विकत घेतलं. या चित्राची किंमत एखाद्या विमानाएवढी असल्याने प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे हे चित्र खरेदी करणारा नेमका कोण आहे? तो किती अब्जावधी आहे? की कोणत्या देशाचा राजा वैगरे आहे का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे हे चित्र नक्की कोणी विकत घेतलंय याविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न  सुरू केले होते. 

हे चित्र विकत घेणारा खरेदीदार सौदीचा राजपूत्र आहे. या राजपूत्राने हे चित्र खरेदी केल्यानेही अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. कारण या राजपूत्राला चित्रांचा किंवा अशा दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद असल्याचं कुणाच्याही ऐकीवात नाही. तसंच या राजपूत्राकडे किंवा त्याच्या कुटुंबाकडे अमाप संपत्ती असल्याचेही पुरावे नाहीत. इतकंच नव्हे तर या चित्राची किंमत हा राजपुत्र सहा महिन्याच्या कालावधीत हप्ते स्वरुपात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही समोर आले आहे. 

आबू धाबीमध्ये नुकतंच एक नवी वास्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आलं आहे. लॉर्वे असं या वास्तुसंग्रहालयाचं नाव असून तिथे हा फोटो ठेवण्यात येणार असल्याचं ट्विट या वास्तुसंग्रहालयाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcultureसांस्कृतिक