शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; 73 वर्षांनंतर दारुवरील बंदी उठवली, यामुळे घेतला निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 20:13 IST

सौदी अरेबिया त्याच्या इस्लामिक रीतिरिवाजांसाठी आणि अतिशय कडक शरिया कायद्यांसाठी ओळखला जातो.

सौदी अरेबिया त्याच्या इस्लामिक रीतिरिवाजांसाठी आणि अतिशय कडक शरिया कायद्यांसाठी ओळखला जातो. पण, काळानुरुप तो हळुहळू बदलत चालला आहे. अशातच, सौदी एका मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. ज्या देशात गेल्या 73 वर्षांपासून दारुवर पूर्णपणे बंदी होती, तिथे आता 2026 पासून निवडक ठिकाणी दारुची विक्री आणि मर्यादित वापर करण्यास परवानगी असेल. 

सौदी अरेबियाच्या 'व्हिजन 2030' योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला पर्यटन आणि जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की, इस्लाममध्ये हराम मानली जाणारी गोष्ट आता सौदीच्या आधुनिक प्रतिमेचा भाग बनेल का? सौदी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा बदल पूर्णपणे नियंत्रित परवाना प्रणाली अंतर्गत केला जाईल.

कुठे मिळणार दारू?देशभरात सुमारे 600 ठिकाणी दारू विकता येते. याचत पंचतारांकित हॉटेल्स, उच्च दर्जाचे रिसॉर्ट्स, डिप्लोमॅटिक झोन आणि निओम, सिंदाला बेट आणि लाल समुद्र प्रकल्प यासारखे प्रमुख पर्यटन प्रकल्प समाविष्ट आहेत. ही सुविधा फक्त आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि स्थलांतरितांसाठी असेल. स्थानिक भागात आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास अजूनही बंदी असेल.

दारू विक्रीचे नियमनवीन नियमांनुसार, फक्त बिअर, वाइन आणि सायडर सारख्या हलक्या अल्कोहोलयुक्त पदार्थांनाच परवानगी दिली जाईल, तर व्हिस्की आणि वोडका सारख्या 20% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या पेयांवर अजूनही बंदी असेल. घरे, बाजारपेठ किंवा सार्वजनिक ठिकाणी दारू विकली जाणार नाही, कोणीही खाजगीरित्या ते तयार करू शकणार नाही. याचा अर्थ असा की अल्कोहोल फक्त परवानाधारक ठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारेच दिला जाईल.

यामुळे हा मोठा निर्णय घेतलाहे पाऊल सौदी सरकारच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश तेलावरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यटन, आतिथ्य आणि मनोरंजन क्षेत्रांना चालना देणे आहे. 2030 च्या एक्स्पो आणि 2034 च्या फिफा विश्वचषकासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी सौदी अरेबियाला त्यांच्या कठोर नियमांमध्ये काही लवचिकता आणण्याची तयारी करत आहे. 

नियम मोडल्यास कडक शिक्षा होईलसरकार या बदलाबाबत सावध आहे. जर कोणत्याही व्यक्तीने परवाना प्रणालीचे उल्लंघन केले किंवा दारूचा गैरवापर केला, तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा उपक्रम संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक विकास झाला पाहिजे आणि इस्लामिक ओळखही जपली पाहिजे. या निर्णयामुळे केवळ पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार नाही, तर हजारो रोजगाराच्या संधीही निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाalcohol prohibition actदारुबंदी कायदाInternationalआंतरराष्ट्रीय