शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

सौदी अरेबियानं लाखो मुस्लिमांना मक्केबाहेरच रोखलं, नेमके काय घडलं? हज दरम्यानच का घेण्यात आला हा मोठा निर्णय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:21 IST

सौदी अरेबियाने २६९६०० हून अधिक लोकांना मक्केत प्रवेश करण्यापासून रोखले आहे...

सौदी अरेबियाने २६९६०० हून अधिक लोकांना हज परमिटशिवाय मक्केत प्रवेश करण्यापासून रोखले आहे. यासंदर्भात बोलताना, आमचा उद्देश हजमध्ये होणारी अधिकची गर्दी रोखणे, असा असल्याचे एका अधिकाऱ्यांने रविवारी (१ जून २०२५) म्हटले आहे. खरे तर, सौदी अरेबिया सरकार मक्केत होणाऱ्या गर्दीमुळे  परमिटशिवाय येणाऱ्या यात्रेकरूंना दोषी ठरवते. एवढेच नाही, तर गेल्या वर्षी उन्हामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये अशा भाविकांची संख्या अधिक होती. याशिवाय, विना परमिट हजलामध्ये येणाऱ्यांसाठी ५,००० डॉलर्सपर्यंत दंड आणि हद्दपारीसारख्या शिक्षेचीही तरतूद आहे.

सौदीमध्ये राहणाऱ्यांनाही घ्यावे लागेल परमिट -नियमाप्रमाणे, केवळ परमिट असलेल्यांनाच हज करण्याची परवानगी दिली जाते. यात, सौदी अरेबियाचे आणि तेथील नागरिकांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी हज नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 हजारहून अधिक सौदीच्या नागरिकांना दंड केला आहे. तसेच 400 हज कंपन्यांचे लायसन्स देखील रद्द केले आहेत.

सध्या मक्केत 14 लाख मुस्लीमएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या मक्केत अधिकृतपणे १४ लाख मुस्लीम आहेत. येत्या काळात ही संख्या वाढू शकते. हज ही मक्का येथे होणारी वार्षिक इस्लामिक तीर्थयात्रा आहे. यात अनेक धार्मिक विधींचा समावेश असतो. मुस्लीम धर्मात, हज करणे हे शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे देयित्व आहे.5 दिवसांच्या यात्रेसाठी येतात 20 लाख लोक -गेल्या काही वर्षांत सौदी अरेबियातील गर्मीचा हज यात्रेवरही मोठा परिणाम झाला आहे. कार यात्रेकरू दिवसाच्या गर्मीमध्येच उघड्यावर आपले विधी  करतात. महत्वाचे म्हमजे, 20 लाख हून अधिक लोक या 5 दिवसीय तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचतात. यावेळी अनेकवेळा चेंगराचेंगरीही दिसून आली आहे.  

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाMuslimमुस्लीमHaj yatraहज यात्रा