शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सौदी अरेबियाच्या एका निर्णयानं आशियाई देशांचं टेन्शन वाढवलं, भारतालाही बसला मोठा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 10:49 IST

जगभरात सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियानं आशियाई खरेदीदार देशांसाठी तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ केली आहे. 

नवी दिल्ली

जगभरात सर्वाधिक तेल निर्यात करणारा देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियानं आशियाई खरेदीदार देशांसाठी तेलाच्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ केली आहे. 

जुलै महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ उन्हाळ्यात तेलाची जास्त मागणी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. सौदी अरेबियाचा हा निर्णय भारतासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो.

जुलैमध्ये आशियाई देशांसाठी अरब लाइट क्रूड ऑइलची अधिकृत विक्री किंमत (OSP) जूनच्या तुलनेत प्रति बॅरल २.१ डॉलरनं वाढली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार ही वाढ अपेक्षेपेक्षा अधिक आहे. तज्ज्ञांनी कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास प्रतिबॅरल १.५ डॉलरच्या वाढीचा अंदाज वर्तवला होता. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात सहापैकी फक्त एकानं कच्च्या तेलाच्या किमतीत प्रतिबॅरल २ डॉलरपर्यंतची उडी मारण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

"कच्च्या तेलाच्या किमतीत इतकी वाढ होईल असा अंदाज नव्हता. विशेषत: अरब लाइट क्रूडच्या किमतीत अशी वाढ होईल याचा विचार केला नव्हता. आम्ही या निर्णयानं खरंच चिंतेत आहोत", असं आशियातील एका ऑइल ट्रेडरनं म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सौदी अरामकोनं ही वाढ केली आहे. जुलैमध्ये तेलाचे उत्पादन ६,४८,००० बॅरल प्रतिदिन वाढवण्याचा OPEC+ देशांमधील करार असूनही हा निर्णय घेण्यात आला आहे. रशिया, अंगोला आणि नायजेरिया सारख्या ओपेक प्लस सदस्य देशांना तेल उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करणे कठीण जात आहे. OPEC+ देशांना जुलै आणि ऑगस्टमध्ये तेल उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यात अडचणी येऊ शकतात. जगातील सर्वात मोठा तेल आयातदार चीन, शांघायसह काही शहरे देखील पुन्हा लॉकडाऊनमधून बाहेर येत आहेत. 

भारत आणि चीनकडून रशियाचं तेल खरेदीची स्पर्धाभारत आणि चीन सातत्याने रशियन तेल खरेदी करत आहेत. या देशांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी रशियावर कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला. भारत आणि चीन मोठ्या सवलतीत रशियन तेल खरेदी करत आहेत. सौदी अरामकोने रविवारी रात्री युरोपियन आणि भूमध्यसागरीय देशांसाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढवल्या. अमेरिकेसाठी कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पIndiaभारतchinaचीन