शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

35 वर्षांनंतर सौदी अरेबियातील चित्रपटगृहांची दारे उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:16 IST

सौदी अरेबियाने एक नवा निर्णय घेऊन केवळ आपल्याच नागरिकांना नव्हे तर जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सौदी सरकारने चित्रपटगृहांवर गेली 35 वर्षे घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसौदीमधील पहिल्या चित्रपटगृहाचे दार मार्च 2018 मध्ये प्रेक्षकांसाठी उघडले जाईल. 2030पर्यंत देशामध्ये 300 चित्रपटगृहे सुरु होतील असा अंदाज सौदी सरकारने व्यक्त केला आहे.या प्रकल्पातून 24 अब्ज डॉलर्स महसूल मिळेल आणि 30 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असाही सरकारला विश्वास वाटतो.

रियाध- सौदी अरेबियाने एक नवा निर्णय घेऊन केवळ आपल्याच नागरिकांना नव्हे तर जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सौदी सरकारने चित्रपटांवर गेली 35 वर्षे घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते. तसेच राजपुत्र मोहम्मद यांच्या प्रयत्नांमुळेच महिलांना गाडी चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी हिबा तावाजी या लेबनिज गायिकेच्या मैफिलीची कार्यक्रमही सौदी अरेबियामध्ये झाला. गेल्या अनेक दशकांच्या बंदीच्या काळानंतर अशा नव्या बदलाचे वारे सौदी अरेबियामध्ये वाहू लागले आहे.या निर्णयानंतर सौदीमधील पहिल्या चित्रपटगृहाचे दार मार्च 2018 मध्ये प्रेक्षकांसाठी उघडले जाईल. 2030पर्यंत देशामध्ये 300 चित्रपटगृहे सुरु होतील असा अंदाज सौदी सरकारने व्यक्त केला आहे. या प्रकल्पातून 90 अब्ज रियाल म्हणजेच 24 अब्ज डॉलर्स महसूल सरकारला मिळेल आणि 30 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असाही सरकारला विश्वास वाटतो.संगिताच्या मौफिलींना परवानगी मिळाल्यानंतर जगभरातील संगीत क्षेत्रातील कलाकारांनी सौदीकडे धाव गेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मैफिलींना सौदीचे नागरिक जोरदार प्रतिसाद देत आहेत. त्याचप्रमाणे यामधून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत आहे. पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी सौदी अरेबियाने अशा नव्या मार्गांचा वापर सुरु केला आहे. राजपुत्र मोहम्मद हे 32 वर्षांचे असून राजे सलमान यांचे ते पुत्र आहेत. आर्थिक आणि राजकीय निर्णयांबरोबरच सांस्कृतीक क्षेत्रामध्ये बदल घडवण्याचे संकेत त्यांच्या निर्णयांमधून मिळत आहेत. 

योगासनांचाही स्वीकारकट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने योगासनांचाचा स्वीकार करताना योग ला खेळाचा दर्जा दिला आहे. सौदी प्रशासनाकडून तसी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या ट्रेड अँड इंडस्ट्रीने क्रीडाप्रकार म्हणून योगासने शिकवण्याला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नोफ मारवाई या महिलेला सौदी अरेबियामधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. नोफ यांनी योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते. 

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयsaudi arabiaसौदी अरेबिया