सौदीत ११ राजपुत्र, अनेक आजी-माजी मंत्र्यांना अटक, भ्रष्टाचारविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:13 AM2017-11-06T03:13:53+5:302017-11-06T03:14:06+5:30

सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे

Saudi 11 sons, many grand-aged and former ministers arrested, anti-corruption campaign | सौदीत ११ राजपुत्र, अनेक आजी-माजी मंत्र्यांना अटक, भ्रष्टाचारविरोधी मोहीम

सौदीत ११ राजपुत्र, अनेक आजी-माजी मंत्र्यांना अटक, भ्रष्टाचारविरोधी मोहीम

Next

रियाध : सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये टिष्ट्वटर, अ‍ॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. शक्तिशाली नॅशनल गार्डसचे प्रमुख, वित्तमंत्री व इतर बड्या पदाधिकाºयांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. नव्याने नेमण्यात आलेले युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सत्तेवर घट्ट पकड मिळविल्याचे संकेत या निमित्ताने दिले आहेत.
गेल्याच आठवड्यात सलमान यांच्या अध्यक्षतेखाली सौदी सम्राटांनी भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती. संशयितांनी देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी त्यांची खासगी विमानेही जप्त करण्यात आली आहेत. सत्तेसाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे सौदी नॅशनल गार्डचे प्रमुख मुतैब बिन अब्दुल्लाह यांनाही बरखास्त करण्यात आले आहे. नौदलाचे प्रमुख आणि आर्थिक विषयांचे मंत्री यांनाही हटविण्यात आले आहे. या घटनाक्रमाने देश हादरून गेला आहे. एका आदेशात म्हटले आहे की, भ्रष्टाचारविरोधी नव्या आयोगाच्या स्थापनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आयोगाचे प्रमुख वली अहद शहजादे (क्राउन प्रिंस) मोहम्मद बिन सलमान हे आहेत.
सौदी अरेबियाच्या सरकारी प्रेस एजन्सीने म्हटले आहे की, सार्वजनिक मालमत्ता वाचविणे, भ्रष्ट लोकांना दंडित करणे हे आयोगाचे लक्ष्य आहे. देशातील उलेमांच्या प्रमुख परिषदेने कारवाईचे समर्थन केले आहे. दहशतवादाविरुद्ध लढाई जेवढी आवश्यक आहे, तितकीच ती भ्रष्टाचाराविरुद्ध आवश्यक असल्याचे या परिषदेने म्हटले आहे. जूनमध्ये मोहम्मद बिन सलमान यांनी उत्तराधिकारी बनण्यासाठी आपल्या ५८ वर्षीय चुलत भावाला मोहम्मद बिन नायफ यांना बाजूला केले होते. त्या वेळी सौदी अरेबियाच्या चॅनल्सने एक व्हिडीओ दाखविला होता. यात दिसत होते की, मोहम्मद बिन सलमान हे आपले मोठे भाऊ मोहम्मद बिन नायफ यांच्यासमोर आदराने गुडघे टेकवून बसले आहेत. त्यानंतर, असे वृत्त आले की, मोहम्मद बिन नायफ यांना नजरकैद करण्यात आले, पण सौदीचे अधिकारी हे वृत्त फेटाळत आलेले आहेत.

Web Title: Saudi 11 sons, many grand-aged and former ministers arrested, anti-corruption campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.