शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

भारतातील चित्र पाहून सत्या नंडेलांना दु:ख अनावर, सर्वोतोपरी मदतीसाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 10:13 IST

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून रुग्णसंख्या दररोज लाखोंच्या पुढे जात आहे. शनिवारी जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले.

ठळक मुद्देभारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून रुग्णसंख्या दररोज लाखोंच्या पुढे जात आहे. शनिवारी जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले.

नवी दिल्ली - अमेरिकेने मागील काही दिवसांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जॅक सुलविन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेनं लसीकरणासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयाचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख सत्या नंडेला यांनी स्वागत केले आहे. तसेच, भारतातील कोरोनाची विदारक परिस्थिती पाहून अतियश वेदना होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून रुग्णसंख्या दररोज लाखोंच्या पुढे जात आहे. शनिवारी जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. या दिवशी कोरोनामुळे २६२४ जणांचा मृत्यू झाला तसेच २ लाख १९ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण पाहून शेजारील राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त होत आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याच्यानंतर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही मदतीचा हात पुढे केला आहे. आता, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नंडेला यांनीही आपलं दु:ख व्यक्त करत मदतीचा हात दिला आहे.  सत्या नंडेला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतातील सद्यस्थिती अतिशय दु:खी आणि वेदनादायक आहे. अमेरिका सरकारने मदत करण्यास तत्परता दाखवल्यामुळे मी आभारी आहे. मायक्रोसॉफ्टकडून मदत कार्यासाठी आपला आवाज, साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा उपयोग सुरूच ठेवणार आहे. तसेच, महत्त्त्वाची बाब म्हणजे ऑक्सिजन कन्सन्ट्रेशन डिवाईसच्या खरेदीसाठीही मदत करेल, असे सत्या नंडेला यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेनं भारताताला कोव्हीशिल्ड लस बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाची पूर्तता करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यानंतर, सत्या नंडेला यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचं स्वागत करत आभार मानले आहेत.  

शोएब अख्तर काय म्हणाला?''कोणत्याही सरकारला या संकटाचा सामना करणं जवळपास अशक्यच आहे. मी माझ्या सरकारला आणि चाहत्यांना आवाहन करतो की भारताला मदत करा. भारताला सध्या ऑक्सिजन टँकची गरज आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी भारताला निधी मिळवून देण्यासाठी दान करा आणि ऑक्सिजन टँक्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा,''असे आवाहन शोएबनं यूट्यूबवरून केलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारत