लंडनच्या मोस्ट वाँटेड यादीत संदीप अरोरा
By Admin | Updated: July 20, 2016 05:16 IST2016-07-20T05:16:08+5:302016-07-20T05:16:08+5:30
इंग्लंडमध्ये गुन्हे केलेल्या दहा वाँटेड लोकांची नावे लंडन पोलीस आणि नॅशनल क्राईम एजन्सीने मंगळवारी प्रसिद्ध केली.

लंडनच्या मोस्ट वाँटेड यादीत संदीप अरोरा
लंडन : इंग्लंडमध्ये गुन्हे केलेल्या दहा वाँटेड लोकांची नावे लंडन पोलीस आणि नॅशनल क्राईम एजन्सीने मंगळवारी प्रसिद्ध केली.
यादीमध्ये बॉलिवूडचा निर्माता संदीप अरोरा (४२, बेक्टन, पूर्व लंडन) याचेही नाव असून त्याने व्हॅट आणि चित्रपटावरील कर चुकवेगिरीतून साडेचार दशलक्ष पौंडांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. जे चित्रपट अस्तित्वातच नाहीत किंवा ज्यात त्याचा काहीही संबंध नाही अशा चित्रपटांच्या करामध्ये अरोराने सूट मागितल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)