अॅंजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची विक्री

By Admin | Updated: September 2, 2015 19:29 IST2015-09-02T18:08:55+5:302015-09-02T19:29:02+5:30

हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अॅंजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील 'झेब्रा वन गॅलरी' येथे अॅंजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी

Sales of Angelina Julie's nude photo | अॅंजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची विक्री

अॅंजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची विक्री

>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २ - हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अॅंजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. 
लंडनमधील 'झेब्रा वन गॅलरी' येथे अॅंजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी काढण्यात आलेला असा दुर्मिळ फोटो प्रदर्शनाला लावण्यात आला होता. तिचा हा दुर्मिळ फोटो १८ हजार पाउंडला विकण्यात आला. ब्लॅक अॅन्ड व्हाईट असलेला हा फोटो केट गार्नर यांनी १९९५ मध्ये काढला होता. यामध्ये ती पायाची घडी घालून बसलेली आहे. 
हॉलिवूडमध्ये टॉपवर असलेल्या या अॅंजेलिना ज्युलीने दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. तिचा 'द सी' हा आगामी चित्रपट येत असून यामध्ये तिच्यासोबतच तिचा नवरा अभिनेता ब्रॅड पीटने सुद्दा काम केले आहे. 

Web Title: Sales of Angelina Julie's nude photo