इराण एका मोठ्या युद्धाला समोरा जात असताना एक संतापजनक कृत्याने जगाला हादरवले आहे. सरकारविरोधी आवाज दाबण्यासाठी पुन्हा एकदा फाशीच्या अस्त्राचा वापर करण्यात आला आहे. इराणच्या न्यायव्यवस्थेने १९ वर्षीय राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सालेह मोहम्मदी याच्यासह सईद दाऊदी आणि मेहदी कासेमी या तीन तरुणांना फाशी दिली आहे. 'देवाविरुद्ध शत्रुत्व' आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे.
इराणमधील अंतर्गत परिस्थिती आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. सालेह मोहम्मदी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कास्यपदक विजेता आहे. सईद दाऊदी आणि मेहदी कासेमी या दोघांवरही निदर्शनांमध्ये सहभाग घेतल्याचा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभाग घेतल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. इराणच्या न्यायालयीन यंत्रणेने त्याच्यावर सशस्त्र बंडखोरी आणि शांतता भंग केल्याचे आरोप लावत त्याला फाशीची शिक्षा सुनावली. सालेहच्या कुटुंबीयांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी ही शिक्षा रद्द करण्याची विनंती केली होती, परंतु इराण सरकारने ती फेटाळून लावत गुरुवारी पहाटे त्याला फासावर लटकवले.
अन्यायकारक खटला आणि जागतिक निषेधमिळालेल्या माहितीनुसार, या तिघांनाही त्यांचे वकील निवडण्याची किंवा स्वतःची बाजू मांडण्याची योग्य संधी देण्यात आली नव्हती. इराणच्या रिव्होल्युशनरी कोर्टाने अत्यंत गोपनीय पद्धतीने हा खटला चालवून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. मानवाधिकार संघटना 'इराण ह्युमन राइट्स' ने या फाशीचा तीव्र निषेध केला असून, ही "न्याय नसून हत्या" असल्याची टीका केली आहे. इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात तरुणांना अशा प्रकारे फाशी देऊन जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसादया घटनेमुळे इराणच्या क्रूर न्यायव्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वीही इराणने नवद अफकारी सारख्या नामांकित कुस्तीपटूला अशाच प्रकारे फाशी दिली होती.