इसिसकडून ओलीस मुलींची विक्री

By Admin | Updated: June 9, 2015 23:53 IST2015-06-09T23:53:30+5:302015-06-09T23:53:30+5:30

सिस वा इस्लामिक स्टेटस्च्या जिहादींकडून इराक व सिरियातून अपहरण केलेल्या शेकडो किशोरवयीन मुलींची विक्री गुलामी बाजारात कवडीमोल भावाने केली जात आहे.

Sale of daughters of this girl | इसिसकडून ओलीस मुलींची विक्री

इसिसकडून ओलीस मुलींची विक्री

संयुक्त राष्ट्रे : इसिस वा इस्लामिक स्टेटस्च्या जिहादींकडून इराक व सिरियातून अपहरण केलेल्या शेकडो किशोरवयीन मुलींची विक्री गुलामी बाजारात कवडीमोल भावाने केली जात असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या लैंगिक हिंसाचारविरोधी प्रतिनिधीने म्हटले आहे.
युनोच्या प्रतिनिधी झैनब बांगुरा यांनी एप्रिल महिन्यात इराक व सिरियाला भेट दिली होती. तेव्हापासून तिथे पाहिलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या भयावह प्रकारांना कसा आळा घालता येईल यावर झैनब विचार करत आहेत. हे युद्ध महिलांच्या देहाचा वापर करून केले जात आहे, असे झैनब यांनी म्हटले आहे.
निर्वासित छावण्यांना भेट
झैनब यांनी इस्लामिक स्टेटस्च्या ताब्यातील भागातून निसटून आलेल्या मुली व महिला, स्थानिक धार्मिक नेते, राजकीय नेते यांच्याशी चर्चा केली असून तुर्की, लेबनॉन व जॉर्डन येथील निर्वासित छावण्यांना भेटी दिल्या आहेत.
जिहादी मुलींसाठी गुलामी बाजार आयोजित करत असून नव्या संघर्षात अपहरण केलेल्या मुलींची तिथे विक्री केली जाते. ते नव्या प्रदेशाचा ताबा घेताना तेथील महिला व मुलींचे अपहरण करत असून, नवनव्या मुलींची सिगारेटच्या पाकिटाइतक्या कमी दरात विक्री करत आहेत.
अनेक किशोरवयीन मुलींची कथा सांगताना झैनब बांगुरा यांनी सांगितले की, यापैकी बहुतांश मुली याझदी वंशाच्या आहेत.
१०० पेक्षा जास्त मुलींना एका घरात कोंडले जाते. तिथे निर्वस्त्र करून त्यांना धुतले जाते व एका रांगेत उभे करून कोणाची किती किंमत हे ठरवले जाते. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Sale of daughters of this girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.