‘इसिसच्या विचारांशी सईद सहमत होता’
By Admin | Updated: December 8, 2015 02:05 IST2015-12-08T02:05:12+5:302015-12-08T02:05:12+5:30
कॅलिफोर्नियातील सॅन बर्नारदिनो येथे २ डिसेंबरच्या रात्री १४ जणांची हत्या व १७ जणांना जखमी करणाऱ्या जोडप्यापैकी सईद फारुकच्या वडिलांनी तो इसिसच्या विचारांशी सहमत होता, असे म्हटले.

‘इसिसच्या विचारांशी सईद सहमत होता’
रोम : अमेरिकेत कॅलिफोर्नियातील सॅन बर्नारदिनो येथे २ डिसेंबरच्या रात्री १४ जणांची हत्या व १७ जणांना जखमी करणाऱ्या जोडप्यापैकी सईद फारुकच्या वडिलांनी तो इसिसच्या विचारांशी सहमत होता, असे म्हटले.
इस्रायलशी लढण्यास तो उत्सुक होता, असे फारुकच्या वडिलांचा हवाला देऊन इटलीतील ‘ला स्टॅम्पा’ या दैनिकाने म्हटले. इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी फारुक इसिसचा प्रमुख अबू बकर याच्या विचारांशी सहमत होता व इस्रायलशी लढण्यासाठी तो खूपच उतावीळ होता, असे या वृत्तात म्हटले. सईद फारुकच्या वडिलांचे नावही सईद फारुकच आहे. मुलगा सईद फारुक व त्याची जन्माने पाकिस्तानी पत्नी आशफीन मलिक यांनी हल्ला केल्यानंतर त्यांचा पाठलाग पोलिसांनी केला व झालेल्या चकमकीत ते दोघेही ठार झाले. वडील सईद फारुक यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ‘मी त्याला तू शांत राहा, दोन वर्षांत इस्रायल शिल्लक राहणार नाही, असे म्हटले होते.