आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:10 PM2019-08-12T17:10:24+5:302019-08-12T17:10:39+5:30

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत.

s jaishankar meets vice president of china wang qishan in china | आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

Next

बीजिंगः भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. देशात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत-चीनचे संबंध स्थिर राहणे गरजेचे आहे. जयशंकर यांनी चिनी उपराष्ट्रपती वांग क्विशान यांच्याशी झोंग्ननहाईदरम्यान भेट घेतली आहे.

त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत एक बैठक घेतली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू वांग यांच्याशी बातचीत करताना ते म्हणाले, आमचं दोन वर्षांपूर्वीच द्विपक्षीय संबंधांसंदर्भात एकमत झालेलं आहे. देश अनिश्चिततेतून जात असताना आपले संबंध स्थिर राहण्याची गरज आहे.

चीनमध्ये पुन्हा आल्यानं मी आनंदात आहे. माझी मागची वर्ष मी आनंदानं स्मरण करतो. मी नशीबवान आहे, मला अनौपचारिक पद्धतीनं शिखर संमेलनाची तयारी करण्याची संधी मिळाली.  जयशंकर यांचं स्वागत करत उपराष्ट्रपती वांग म्हणाले, मला हेसुद्धा माहीत आहे की, चीनमध्ये बऱ्याच काळापासून राहणारे जयशंकर हे भारतीय राजदूत आहेत. दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि चीनसाठी फायदेशीर ठरणार असल्याचंही वांग म्हणाले. जयशंकर यांच्या या दौऱ्यात चार द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली जाणार आहे. 

Web Title: s jaishankar meets vice president of china wang qishan in china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.