शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

S-400 करार :CAATSA निर्बंधांबाबतचा निर्णय भारताला लवकरच कळेल, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 09:00 IST

काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारताला लवकरच माहिती कळेल, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

वॉशिंग्टन - अमेरिकेने केलेला विरोध डावलून भारतानेरशियासोबत S-400  मिसाईल डिफेन्स सिस्टीमसाठी करार केला होता. दरम्यान, हा करार झाल्यापासून अमेरिकेकडून भारतावर निर्बंध घालण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारताला लवकरच माहिती कळेल, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.रशियासोबत संरक्षण सामुग्रि करार करणाऱ्या भारताला CAATSA अंतर्गत भारताला सूट देण्याचा अधिकार केवळ ट्रम्प यांच्याकडे आहे. भारताने रशियासोबत केलेल्या या कराराबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले की, " अमेरिकेचा विरोध डावलून रशियासोबत करार करणाऱ्या भारताला CAATSA अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत लवकरच माहिती मिळेल. तुम्ही पाहालच, तसेच इराणकडून होणारी तेलखरेदी थांबवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या 4 नोव्हेंबरच्या डेडलाइननंतरही तेलाची आयात करणाऱ्या देशांनाही अमेरिका पाहून घेईल, "असा सज्जड दमही ट्रम्प यांनी दिला. सध्या इराणकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध घालण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असताना भारत आणि चीनसारखे मोठे देश इराणकडून तेलखरेदी करत आहेत.अमेरिकन प्रशानसनात गेल्या काही दिवसांमध्ये बदललेली राजकीय समीकरणे आणि भारताच्या व्यापार शुल्क धोरणांबाबत अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक मत पाहता रशियासोबत केलेल्या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम करारानंतर भारताला  CAATSA निर्बंधांमधून सूट मिळणे कठीण असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.   काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?एस-400 ही जगातील अत्याधुनिकमिसाईल डिफेन्स सिस्टीम असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे.  एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे.  ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप आहे. अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIndiaभारतrussiaरशिया