रशियाने युक्रेनवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे ज्यात एका व्यक्तीच्या मृत्यूसह किव शहरातील अनेक परिसराला फटका बसला आहे. वेस्टर्न पोर्ट ओडेसाच्या एका मेटर्निटी वार्डवरही हल्ला झाला आहे परंतु इथल्या नुकसानीची माहिती समोर आली नाही. या हल्ल्यापूर्वी रशियाने युक्रेनवर ५०० ड्रोन-मिसाईल हल्ले केले होते. रशियाची ही कारवाई अलीकडेच युक्रेनने रशियातील एअरबेसवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून केली जात आहे.
किव शहरात रात्रभर झालेल्या हल्ल्यात ४ जण जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. रिपोर्टनुसार, रात्रभर किव शहरातील १० जिल्ह्यांपैकी ७ वर हल्ले करण्यात आले. कीव आणि युक्रेनमध्ये बहुतांश भागात हवाई हल्ल्याचा इशारा पहाटे ५ पर्यंत कायम होता. हे ड्रोन हल्ले रहिवासी तसेच सैन्य तळांवर करण्यात आले. त्यामुळे अनेक भागात आग लागली होती. शहरात रात्रभर जोरदार स्फोटाचे आवाज ऐकायला येत होते.
दरम्यान, रशियाकडून देशात ३१५ ड्रोन हल्ले करण्यात आले त्यातील २७७ ड्रोन हवेतच मारण्यात यश आले. त्याशिवाय रशियाने ७ मिसाईलचा मारा केला त्यालाही युक्रेन एअर डिफेन्स सिस्टमने हवेत मारले असा दावा युक्रेन सैन्याकडून करण्यात आला आहे.
शुक्रवारीही झाला होता हल्ला
रशियाने ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० हून अधिक ड्रोनचा वापर केल्याचे युक्रेनच्या सूत्रांनी म्हटलं. अनेक शहरांत कित्येक तास स्फोटांचे आवाज येत होते. या हल्ल्यांमुळे कित्येक इमारतींमधून आगीचे लोळ उठलेले दिसत होते. या हल्ल्यानंतर इमारतींसह ढिगाऱ्यांमध्ये शोधमोहिमेसह बचावकार्य सुरू असल्याचे कीव्हचे महापौर विताली क्लित्स्को यांनी म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य अन् रशियाचे हल्ले
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धावर तोडगा काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर बुधवारी एक वक्तव्य केले होते. या दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढाकार घेण्यापूर्वी काही काळ मनसोक्त लढू देणेच योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काही तासांतच रशियाने हे हल्ले केले होते.