रशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 09:52 PM2018-03-06T21:52:07+5:302018-03-06T21:52:07+5:30

रशियाचे एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील 32 जण ठार झाले आहेत.

Russia's carrier collapses in Syria, killing 32 people | रशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार

रशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार

Next

मॉस्को - रशियाचे एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील 32 जण ठार झाले आहेत. या विमानात 26 प्रवासी व सहा कर्मचारी होते. धावपट्टीपासून 500मीटर उंचावर असताना हे विमान अचानक कोसळले. हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

रिया नोवोस्ती न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, ही दुर्घटना सीरियातल्या किनारी भागातल्या लताकीया या शहराजवळ झाली आहे. रशियाचं लष्करी विमान हमेमिक विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटनेचं शिकार झालं आहे. कोणत्याही शत्रूनं हे विमान पाडलेलं नाही आणि त्याची चौकशी सुरू आहे. विमान दुर्घटनेची सखोल चौकशी केली जात असल्याचं रशियाच्या प्रशासनानं सांगितलं आहे. 



 

 

Web Title: Russia's carrier collapses in Syria, killing 32 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :russiaरशिया