शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

Russian Ukraine War : युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 08:41 IST

Russian Ukraine War : युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील लढाई आता काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. एकटा पडल्याने युक्रेन लवकर शरणागती पत्करेल असे रशियाला वाटत होते. परंतू राजधानी कीवपर्यंत वेगाने धडक मारलेल्या रशियाला कीवमध्ये जोरदार प्रत्यूत्तर मिळत आहे. यातच युक्रेनने रशियाला युद्ध थांबवून चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले होते. रशियाने ते स्वीकार केले होते. मात्र, रशियाने युक्रेनवर गंभीर आरोप केला आहे. रशियाने केलेल्या दाव्यानुसार चर्चेसाठी जो प्रस्ताव दिला होता, तो युक्रेनने स्वीकारलेला नाही. यामुळे आता युक्रेनवर यापेक्षा जोरदार हल्ले चढविले जाणार आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सैन्याला युक्रेनवरील हल्ले आणखी वेगवान आणि आक्रमक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे. 

भीषण परिस्थिती, स्फोटांचे आवाज, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ असं सगळं सुरू असताना एका जोडप्याने लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण ऐकून तुम्ही देखील भावूक व्हाल. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार 21 वर्षीय यारयाना अरिएवा (Yaryna Arieva) आणि तिचा पार्टनर 24 वर्षीय प्रियकर स्वियाटोस्लाव फर्सिन (Sviatoslav Fursin ) यांनी कीवमधील सेंट मायकल मॉनेस्ट्रीमध्ये लग्न केलं. खरं तर त्यांना सहा मे रोजी लग्न करायचं होतं. डनिपर नदीवर उभारलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ते हा सोहळा अत्यंत आनंदात साजरा करणार होते. 

"आम्ही जिवंत राहू की नाही काय माहिती? आमचं भविष्य काय असेल?"

देशामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे सर्व काही अचानक बदललं. "आम्ही जिवंत राहू की नाही काय माहिती? आमचं भविष्य काय असेल? याबाबत कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आम्ही लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला" अशी प्रतिक्रिया जोडप्याने आपल्या लग्नावर दिली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे. अरिएवाने परिस्थिती अत्यंत भीषण आहे. आम्ही आमच्या देशासाठी सध्या लढत आहोत. कदाचित आमचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळेच असं काही होण्याआधी आम्हाला एक व्हायचं आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रहिवासी इमारतींवर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले

धोक्याची घंटा वाजली आहे. रशियाचे सैन्य युक्रेनच्या जमिनीवर आता आणखी वेगाने व क्रूरतेने आक्रमण करणार आहेत. यामुळे गेल्या तीन दिवसांपेक्षा भयानक ठरण्याची शक्यता आहे. रशियाने रहिवासी इमारतींवर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले होते. यापेक्षा जास्त हल्ले सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैसे पाठविले आहेत. तसेच फ्रान्सने शस्त्रे पाठविली आहेत. ती वाटेत असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे हे युद्ध दोन्ही बाजुंनी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाmarriageलग्न