शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

शक्तीशाली नेता, जलतरणपटू, संघर्षातून यश अशी आहे पुतिन यांची लाइफस्टाइल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:46 IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं नाव जगातल्या सर्वात शक्तीशाली नेत्यांमध्ये घेतलं जातं. २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे आपल्या शाही लाइफस्टाइलसाठीही नेहमी चर्चेत असतात.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं नाव जगातल्या सर्वात शक्तीशाली नेत्यांमध्ये घेतलं जातं. ते २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे आपल्या शाही लाइफस्टाइलसाठीही नेहमी चर्चेत असतात. त्यांचा जीवनाचा प्रवास एका योध्यासारखा राहिला आहे. चला जाणून घेऊ त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी....

साहस आणि रोमांच आहे पुतिन यांची पसंत

आतापर्यत ४ वेळा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झालेले पुतिन यांना साहस आणि रोमांच पसंत आहे. ते एक कुशल जलतरणपटू तर आहेतच सोबतच ते उत्तम घोडेस्वारही आहेत. त्यांना अॅडव्हेंचरशी निगडीत अॅक्टिव्हिटी करताना नेहमीच बघितले जाते. इतकेच नाही तर पुतिन यांनी मार्शल आर्टचंही ट्रेनिंग घेतलं आहे. 

टाइम मॅगझिनच्या कव्हरवर फोटो

२००८ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हरवर पुतिन हे या अंदाजात दिसले होते. प्रसिद्ध फोटोग्राफर पेल्टन यांना या फोटोसाठी २००८ चा वर्ल्ड प्रेस फोटोचा पुरस्कारही मिळाला होता. या फोटोला त्यावेळी इतकी प्रसिद्धी मिळाली होती की, या फोटोतून पुतिन यांची जगतील प्रतिमा एक कठोर, त्वरित निर्णय घेणारा आणि चाणाक्ष राजकीय नेता म्हणून झाली. 

लेनिन आणि स्टॅलिनसोबत खास नातं

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा जन्म एका सामान्य परिवारात झाला होता. त्यांचे आजोबा लेनिन यांच्या कंट्री हाऊसमध्ये शेफ होते, त्यानंतर ते स्टॅलिनचेही शेफ झाले. सेंट पीट्सबर्गमध्ये जन्माला आलेल्या पुतिन यांच्या जीवनाची सुरुवात १ खोली असलेल्या घरातून झाली होती. तेथून ते केवळ रशियाच्याच नाही तर जगातल्या सर्वात शक्तीशाली लोकांच्या यादीत जाऊन पोहोचले. 

नास्तिक होते पुतिन नंतर झाले आस्तिक

व्लादिमिर पुतिन हे सुरुवातीच्या जीवनात साम्यवादी विचारांनी फार जास्त प्रभावित होते. विद्यार्थी असतानापासून ते स्वत:ला नास्तिक सांगत होते. पण त्यांच्या जीवनात घडत गेलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे ते देवावर विश्वास ठेवू लागले. १९९० मध्ये त्यांच्या पत्नीचा कार अपघात आणि त्याच वर्षी घरात लागलेल्या आगीनंतर ते चर्चमध्ये जाऊ लागले. पुतिन आता नियमीतपणे चर्चमध्ये जातात. 

पुतिन यांची अॅपल वॉच होती चर्चेत

रशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या महागड्या शौकांसाठीही ओळखले जातात. त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आणि घड्याळांचं कलेक्शन आहे. ते अॅपल वॉचच्या कस्टमाइज कलेक्शनचा वापर करतात. 

कुत्र्यांची नावे ठेवण्यासाठी देशव्यापी स्पर्धा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या लाइफस्टाइलला सहजपणे किंग साइज म्हटले जाऊ शकते. त्यांनी आपल्या पाळिव कुत्र्यांची नावे ठेवण्यासाठी देशव्यापी स्पर्धा घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बल्गेरियन शेफर्डचं नाव बफी ठेवलं होतं. त्यांच्याकडे अनेक पाळीव प्राणी आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी मोठा खर्च केला जातो. 

स्वित्झर्लंडची जिमनॅस्ट गर्लफ्रेन्ड?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची कथित गर्लफ्रेन्ड आणि तिच्याकडून झालेल्या मुलीचा किस्सा प्रसारमाध्यमात आला आहे. स्वित्झर्लंडची जिमनास्ट एलिना काबावेवासोबत त्यांच्या कथित अफेअरची चांगलीच चर्चा होत असते. एलिनाने याचवर्षी एका मुलीला जन्म दिला. स्विस मीडियामध्ये या मुलीचे वडील रशियाचे राष्ट्राध्यक्ष सांगण्यात आले आहेत. पुतिन यांनी पत्नीकडून ३१ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला आहे. त्यांना दोन मुलीही आहेत.  

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाPoliticsराजकारण