Russia Plane Crash:रशियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टेकऑफनंतर एक विमान हवेतून अचानक गायब झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे विमान ५० प्रवाशांना घेऊन चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते. मात्र, हवेत असताना विमानाचा वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.
सविस्तर माहिती अशी की, रशियन एअरलाइन्स अंगाराचे प्रवासी विमान An-24 ने गुरुवारी उड्डाण केले, मात्र काही वेळातच रडारवरुन बेपत्ता झाले. या विमानात पाच मुले आणि सहा क्रू सदस्यांसह ४३ प्रवासी होते. या घटनेमुळे मॉस्कोमध्ये घबराट पसरली असून, विमानाचा शोध घेतला जात आहे. उड्डाण करताच एटीसीशी संपर्क तुटला
विमानाने इर्कुत्स्क शहरातून उड्डाण केले, ते याकुत्स्कला पोहोचणार होते, परंतु उड्डाणानंतर काही वेळातच त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क तुटला. अनेक प्रयत्न करूनही विमानाशी संपर्क होऊ शकला नाही, ज्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. रशियन आपत्कालीन मंत्रालयाने शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. विमानाचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.
खराब हवामान आणि परिसरातील दुर्गमतेमुळे शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी अद्याप विमान क्रॅश झाल्याची किंवा आपत्कालीन लँडिंगची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. संपूर्ण देशाचे या घटनेकडे लक्ष लागले आहे. प्रवाशांचे नातेवाईकही विमानतळावर जमण्यास सुरुवात झाली आहे.