शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रशियन लष्कराचं विमान युक्रेनच्या सीमेलगत दुर्घटनाग्रस्त, ६५ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:45 IST

Russian Army Plane Crash: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तणावग्रस्त असलेल्या दोन्ही देशांच्या सीमेलगत आज एक मोठी विमान दुर्घटना झाली आहे. युक्रेनच्या सीमेजवळ रशियन लष्कराचे विमान कोसळून ही दुर्घटना झाली आहे. त्यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तणावग्रस्त असलेल्या दोन्ही देशांच्या सीमेलगत आज एक मोठी विमान दुर्घटना झाली आहे. युक्रेनच्या सीमेजवळ रशियन लष्कराचे विमान कोसळून ही दुर्घटना झाली आहे. त्यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे. मृत्यू झालेले ६५ जण हे रशियाच्या ताब्यात असलेले युक्रेनच्या सशस्त्र दलाचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या भागातील स्थानिक गव्हर्नर व्याचेस्लाव्ह ग्लादकोव्ह यांनी मला या दुर्घटनेबाबत प्राथमिक माहिती आहे, असे सांगितले. मात्र त्यााबाबत काही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिलाा दुर्घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विमान खाली कोसळताना दिसत आहे. रशिया टुडे इंडियानेही या दुर्घटनेचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये रशियन लष्कराचं एक वाहतूक विमान अचानक खाली येताना आणि एका रिफायनरीजवळ कोसळताना दिसत आहे.

एका वृत्तसंस्थेने रशियन संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की, या विमानात युक्रेनच्या लष्करातील पकडण्यात आलेले ६५ सैनिक होते. त्यांना एक्स्चेंजसाठी बेलगोरोद येथे आणण्यात येत होते. त्यांना युक्रेनच्या सीमेवर नेण्यात येणार होते. तसेच विमानामध्ये ६ क्रू मेंबर आणि कैद्यांना आणण्यासाठी निघालेले ३ एस्कॉर्ट्सही होते.   दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत हजारो सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाairplaneविमानAccidentअपघात