शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: रासायनिक अस्त्रे वापरल्यास ‘नाटो’चे जशास तसे उत्तर; जो बायडेन यांचा रशियाला खणखणीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:35 IST

Russia vs Ukraine War: बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले असून, त्यांनी नाटो, जी-सात, तसेच युरोपीय समुदायाच्या नेत्यांशी युक्रेन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली.

ब्रुसेल्स : युक्रेनमध्ये रशियाने रासायनिक अस्त्रांचा वापर केल्यास नाटो देश त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देतील, असा खणखणीत इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले असून, त्यांनी नाटो, जी-सात, तसेच युरोपीय समुदायाच्या नेत्यांशी युक्रेन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली.बायडेन यांच्या वक्तव्याप्रमाणे परिस्थिती उद्भवल्यास नाटो व युरोपीय देशही युक्रेन युद्धात रशियाच्या विरोधात सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात सुरू झाली आहे. युक्रेनमध्ये रशिया रासायनिक किंवा जैविक अस्त्रांचा वापर करण्याची शक्यता असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांकडून वारंवार होत आहे. युक्रेनवर आक्रमण होऊनही अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशाने युद्धात आतापर्यंत थेट हस्तक्षेप केलेला नाही.जी-२० गटातून रशियाला काढून टाकाअमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियाला जी-२० गटातून काढून टाकले पाहिजे. जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी युरोपीय समुदाय व अन्य १९ देशांनी एकत्र येऊन जी-२० गटाची स्थापना केली आहे. मात्र, त्याच्या तत्त्वांना रशियाने हरताळ फासला, असे बायडेन यांनी सांगितले. मारियुपोल हल्ल्यात ३०० जण ठार ?गेल्या १६ मार्च रोजी मारियुपोल शहरातील एका चित्रपटगृहावर रशियाच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात सुमारे ३०० जण ठार झाले होते, असा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या लोकांनी पत्रकारांना ही माहिती दिली. जो बायडेन पोलंडमध्ये दाखलयुक्रेन युद्धामुळे युरोपच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी पोलंडमध्ये दाखल झाले. युक्रेनचा शेजारी देश असलेल्या पोलंडमध्ये अमेरिकी लष्कराच्या काही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शत्रूंपासून पोलंडचे रक्षण करण्यासाठी त्या देशाच्या लष्कराला अमेरिकी सैनिक मदत करणार आहेत. पोलंडमध्ये २० लाख युक्रेन निर्वासित आश्रयाला आले आहेत. त्यांची स्थिती बायडेन यांनी जाणून घेतली, तसेच पोलंडमधील अमेरिकी सैनिकांशीही संवाद साधला. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJoe Bidenज्यो बायडनVladimir Putinव्लादिमीर पुतिन