शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

HIV-हेपेटायटिस रुग्णांचा शस्त्र म्हणून वापर करणार पुतिन? प्रायव्हेट आर्मीत होतेय आजारी कैद्यांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 03:37 IST

खासगी सैन्यात भरती होणारे हे रुग्ण रशियातील कैदी असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. या युद्धात ज्या पद्धतीने रशियाचा प्रतिकार केला जात आहे, तो व्लादिमीर पुतिन यांना कदापी अपेक्षित नसेल. रशिया काही दिवसांत युक्रेनचा ताबा घेईल, असे मानले जात होते, पण तसे झाले नाही. या युद्धात रोजच्या रोज नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे. यातच, आता पुतिन यांचे खाजगी सैन्य (वेगनर ग्रुप) एचआयव्ही आणि हिपॅटायटीस सी असलेल्या रूग्णांची भरती करत आहे, ज्यांना युक्रेन युद्धात पाठवण्याची तयारी केली जात असल्याचेही वृत्त आहे.

खासगी सैन्यात भरती होणारे हे रुग्ण रशियातील कैदी असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यूकेच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे, की पूर्वीच्या लढायांमध्ये वेगनर ग्रुपमध्ये भरतीचे मानक खूप उच्च होते. हिच्या अनेक ऑपरेटर्सनी प्रोफेशनल सोल्जर म्हणून काम केले आहे. मात्र, आता आजारी कैद्यांची भरती केली जात आहे. यावरून अनुभव आणि गुणवत्तेपेक्षा कशाला अधिक प्राधान्य दिले जात आहे, हे स्पष्ट होते.

'प्रायव्हेट आर्मीत 100 हून अधिक कैद्यांची भरती - व्लादिमीर पुतिन यांच्या खाजगी सैन्यात 100 हून अधिक कैद्यांची भरती करण्यात आली आहे. ते ओळखले जावेत यासाठी त्यांना रंगीबेरंगी ब्रेसलेट घालण्यात आले आहे. युक्रेनच्या लष्करी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे इतर रशियन सैनिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार अशा सैनिकांना इतर सैनिकांपासून वेगळे ठेवले जात आहे. तसेच त्यांना 'सामान्य सैनिकां'ना भेटण्यापासूनही रोखले जात आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाSoldierसैनिक