शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: ‘व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, म्हणजे युद्ध थांबेल’, अमेरिकन खासदाराच्या विधानाने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:41 IST

Russia Ukraine War: अमेरिकेच्या एका खासदाराने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी हे विधान केले आहे.

न्यूयॉर्क - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्ती आमने-सामने आल्या आहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या एका खासदाराने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी हे विधान केले आहे. कुणीतरी व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, त्यानंतरच हे युद्ध थांबू शकते, असे ते म्हणाले.

दरम्यान, दक्षिण कॅरोलिनामधील रिपब्लिकन खासदार असलेल्या लिंडसे ग्राहम यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांचा उल्लेख जीनियस असा करणे ही मोठी चूक होती, असेही म्हटले आहे.  रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठवडाभरापासून भीषण संघर्ष सुरू आहे. त्यानंतर रशियावर अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत.

लिंडसे ग्राहम म्हणाले की, रशियामधून या माणसाला बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे याची हत्या करणे. जर असे केले तर ते हा देश आणि जगावर मोठे उपकार होतील. केवळ रशियातील नागरिकच हे काम करू शकतात. पण हे बोलणे सोपे आहे पण करणे कठीण, असेही त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, गुरुवारी बायडेन यांच्या प्रशासनाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या काही निकटवर्तीयांवर नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली होती. नव्या निर्बंधांतर्गत पुतीन यांचे प्रेस सचिव दमित्री पेसकोव्ह आणि रशियन उद्योगपती अलीशेर बुरहानोविच यांच्यासह पुतीन यांच्या अजून एका निकटवर्तीयाला लक्ष्य केले होते. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने १९ रशियन व्यावसायिकांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर व्हिसा निर्बंध लावण्याची घोषणा केली होती.  

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धUnited Statesअमेरिका