शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: हल्ल्यापासून रक्षणासाठी यूक्रेन करतंय भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर; रशियाचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 08:18 IST

Russia-Ukraine War: बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास रशिया मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला.

Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं. 

'आमचं लष्कर कीव आणि खारकीवमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास पूर्णपणे मदत करत आहे. परंतु युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं आहे,' असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मानवी ढाल बनवत आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना रोखलं जात आहे, असा खळबळजनक दावा रशियानं केला आहे. खारकीवमधूनही भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं रशियानं म्हटलं आहे.  युक्रेनकडूनही मोठं वक्तव्य याचदरम्यान युक्रेनकडून मोठं वक्तव्य समोर आलं आहे. आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी एक कॉरिडोअर तयार करण्यासाठी रशियासोबतच चर्चा करं असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्वीट करत भारत आणि अन्य देशांना आवाहन केलं आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे खारकीव, सुमीसह अन्य शहरात आपल्याला अडकलेल्य़ा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मानवी कॉरिडोअर बनवण्यास रशियाची चर्चा करा असं युक्रेननं भारत, पाकिस्तान आणि चीनला सांगितलं.

जे भारतीय विद्यार्थी अडकले आहेत त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली जावी, अशी मागणी भारतानं रशियाकडे केली होती. तर दुसरीकडे यादरम्यान रशियानंच युक्रेनवर गंभीर आरोप केले. जे रणगाडे रोखले जात आहेत, त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 

तर दुसरीकडे पोलंडमध्ये बॉर्डर गार्ड्सनं १०० भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांना पुन्हा युक्रेनच्या दिशेने पाठवलं असल्याचा दावा बेलारुसच्या राजदूतांना युएनमध्ये केला. युक्रेनमधून आतापर्यंत १७ हजारांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणल्याचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केलाय.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी